रंग खेळून झाल्यानंतर त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोणता Face pack लावाल? उत्तर इथे मिळेल!

| Updated on: Mar 18, 2022 | 8:29 PM

जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या आरोग्याबाबत जागृत असाल तर, रंगपंचमी खेळल्यानंतर टोमॅटो आणि दही यांचा फेसपॅक त्वचेवर लावायला विसरू नका. या लेखात आम्ही दही-टोमॅटो फेसपॅक कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत ते दाखवणार आहोत. हा फेसपॅक तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल.

रंग खेळून झाल्यानंतर त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोणता Face pack लावाल? उत्तर इथे मिळेल!
होळी खेळून झाल्यानंतर रंगामुळे त्रस्त आहात?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रंगपंचमीच्या (Holi) दिवशी लोक एकमेकांना रंग (colours) लावून होळीच्या शुभेच्छा देतात. या विशेष प्रसंगी, गुलालाव्यतिरिक्त अनेक जण रासायनिक रंगांचादेखील वापर करीत असतात. रंगपंचमीनंतर कालांतराने या रासायनिक रंगांचे नुकसान त्वचेवर आणि केसांवर दिसून येते. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे आवश्यक ठरत असते. रंगांमुळे त्वचेवर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. त्वचेवर ओरखडे, कोरडेपणा आदी विविध समस्या निर्माण होत असतात. रंगपंचमी खेळल्यानंतर अनेक जण अंघोळ करुन संपूर्ण रंग काढून टाकतात. त्यांच्या मते रंग निघाला म्हणजे त्वचा (skin) स्वच्छ झाली. परंतु तसे नाही. हा त्यांचा गैरसमज ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, रसायनांसह हे रंग निघू शकतात, परंतु काहीवेळा ते त्वचेला आतून नुकसान करतात. या नुकसानीचा परिणाम काही तासांनंतर चेहऱ्यावर मुरूम, पुरळ या स्वरूपात दिसून येतो.

असा तयार करा फेसपॅक

दही आणि टोमॅटोचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला तीन चमचे दही आणि तीन चमचे टोमॅटोचा रस लागेल. या दोन्ही गोष्टी एका भांड्यात घेऊन नीट मिक्स करा. आता हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ कोरडा होउ द्या. तुम्हाला हवे असल्यास हा पॅक तुम्ही हातावरही लावू शकता. साधारण 20 मिनिटे असा पॅक ठेवल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

फेसपॅकचे फायदे असे

  1. टोमॅटोमध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे असतात आणि त्यात अम्लीय गुणधर्म देखील असतात. ते तुमच्या त्वचेची पीएच पातळी राखण्यात मदत करतात. त्वचेला खोलवर साफ करणारे गुणधर्म असतात. त्वचेची खोल साफसफाई केली तर मुरूम होत नाहीत. त्यामुळे त्यापासून बनवलेला पॅक लावल्याने त्वचा चांगली स्वच्छ होऊ शकते आणि त्यामुळे होणारी जळजळही कमी होऊ शकते.
  2. त्वचेवर रंगांमुळे कोरडेपणाही येऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर सतत पाणी फवारल्याने चेहरा कोरडा होऊ शकतो. त्वचेवरील हा कोरडेपणा दूर करण्यासाठी दही अत्यंत गुणकारी मानले जाते. दह्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्सने त्वचा दुरुस्त करतात. विशेष म्हणजे यामुळे त्वचेला जास्त काळ ‘हायड्रेट’ ठेवता येते.
  3. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात जे त्वचेला नुकसान करतात. टोमॅटोमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. यातून त्वचा स्वच्छ होण्यास मदत होत असते.

इतर बातम्या :

शरद पवार पावसात भिजूनही NCP चे 54 आमदार, गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं

संजय राऊतांसह 6 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं

मजबूत अन्‌ चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल