कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांची यादी जाहीर
कुणाला पुन्हा संधी मिळणार?
भाजपवर सतत परखड टीका करणारे नेते म्हणून संजय राऊत यांना ओळखले जाते. तसेच महाविकास आघाडीच्या निर्मितीतही संजय राऊतांची भूमिका महत्वाची राहिली आहे. दिल्लीच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात संजय राऊत यांचं चांगलं वजन आहे. संजय राऊत रोज भाजवर तुटून पडतात त्यामुळे ते रोज हेडलाईनमध्येही असतात. दिल्लील्या संसदेतही ते भाजपविरोधात जोमाने खिंड लढवताना दिसतात. अनेक मोठे मुद्दे संजय राऊत दिल्लीच्या संसदेत उपस्थित करताता. त्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. त्यामुळे त्यांना संधी पुन्हा मिळणार की नाही, याकडे अनेक नजरा लागल्या आहेत. तसेच पियुष गोयल यांचेही नाव या यादीत आहे. पियुष गोयल हे सध्या केंद्रीय मंंत्रिमंडलातील मोठं नाव आहे. या दोन बड्या नेत्यांबरोबरच काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांचेही नाव या यादीत आहे. चिंदमबरम यांना काँग्रेसच्या ताफ्यात जेष्ठ आणि अनुभवी नेतृत्व म्हणून मानाचे स्थान आहे.
कुणाला पुन्हा संधी कुणाला डच्चू?
शिवाय या यादीत भाजप खासदार विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचीही नावं आहेत. त्यांना पुन्ही संधी मिळणार की आता खांदेपालट होणार? असा सवाल राजकारणात विचारला जातोय. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांच्या जवळचे नेते अशी ओळख असलेले प्रफुल्ल पटेल यांचाही कार्यकाळ संपणार आहे.
जरा धीर धरा, मोदी युगानंतर BJPमध्ये फूट पडेल; Veerappa Moily यांचा G-23 नेत्यांना सल्ला
Raju Shetti महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; 5 एप्रिलच्या मेळाव्यात घेणार निर्णय
तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, माझ्यावरील संकट आघाडी निर्मित-दरेकर