तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, माझ्यावरील संकट आघाडी निर्मित-दरेकर

कारवाईला सुरूवात झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. तसेच आज दरेकरांनी आज पुन्हा तोच आरोप केलाय.

तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, माझ्यावरील संकट आघाडी निर्मित-दरेकर
भाजप नेते प्रवीण दरेकरImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:18 PM

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकरांवर (Pravin Darekar) सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्यांचं आणि भाजपचं टेन्शन वाढलं आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयानं विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रविण दरेकर यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रविण दरेकर यांच्यावर तोपर्यंत कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या कारवाईला सुरूवात झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. तसेच आज दरेकरांनी आज पुन्हा तोच आरोप केलाय. माझ्या वरच संकट हे महाविकास आघाडी निर्मित संकट आहे. आणि तसेही मी त्याला संकट मानत नाही. न्याय व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी असते. असे म्हणत महाविकास आघाडीला प्रतिआव्हान दिलंय.

उसळी मारून पुढे येईन

तसेच सोमवारी सुनावणीनंतर सत्य समोर येईल. माझ्यावर कसलेही दडपण नाही, मी घाबरणाऱ्यातला नाही, असेही दरेकर म्हणाले आहेत. तसेच जेवढं दडपण आणण्याचा प्रयत्न कराल तेवढी उसळी मारुन पुढे येईन, विधान परिषदेत पूर्ण ताकदीने लोकांचे प्रश्न मांडत राहणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीलाही नापास विद्यार्थी म्हणत पुन्हा डिवचलं आहे. तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. जयंत पाटलांनी हे तर त्यांनी मान्य केले की आम्ही सरकार पडणार नाही, ह्यांचे आपआपसातले वाद आहेत. राज्य आज वाऱ्यावर पडलं आहे, सक्षम नेतृत्वाची आज गरज आहे आणि तो पर्यया फक्त भाजप आहे, असेही दरेकर म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार

तसेच शरद पवार यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेताला आहे. शरद पवार पक्ष वाढवण्याचे काम करू शकतात. मात्र आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल. पंतप्रधान मोदी यांच्यासारखे नेतृत्व पूर्ण देशात नाही, असे म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजपचे सरकार आलेच होते, पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे तिन्ही वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सोबत आले. अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांना आत्मपरिक्षणाचाही सल्ला दिला आहे.

Sharad Pawar यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र

विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा नाही, मलिकांच्या राजीनाम्याला पुन्हा धार्मिक रंग

आमचा रंग ओरिजनल , दाऊदच्या माणसाला साथ देणाऱ्या शिवसेनेचा रंग फिका, रावसाहेब दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.