AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केलेले आरोप, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर दानवे यांनी टीका केलीय.

Sharad Pawar यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र
रावसाहेब दानवेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 4:43 PM
Share

औरंगाबाद :केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांचा आज वाढदिवस आहे. रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आणि होळी एकाच दिवशी आल्यानिमित्त कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा द्यायला जमले होते. रावसाहेब दानवे यांनी यावेळी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केलेले आरोप, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर दानवे यांनी टीका केलीय. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे कान पकडले पाहिजेत. मात्र, त्यांची अवस्था सध्या शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, अशा शब्दात दानवे यांनी टीका केलीय.

रावसाहेब दानवे यांचं शरद पवारांवर टीकास्त्र

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी आता त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावं, असं दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी. पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत पण शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

माझं नेहमीचं कलरफुल असतं

माझं नेहमीच कलरफुल असतं. मी वाढदिवस कधीच साजरा करत नाही पण होळीच्या दिवशी वाढदिवशी आल्यामुळे लोक मला शुभेच्छा द्यायला येत आहेत. लहानपणी आम्ही खूप होळी साजरी करायचो. गोवऱ्या गोळा करायचो बोंब ठोकायचो ज्याच्यासंग भांडणं त्याच्या नावाने बोंब ठोकायचो, अशा आठवणी देखील रावसाहेब दानवे यांनी जागवल्या.

पाहा व्हिडीओ

 संजय राऊतांवर टीकास्त्र

आमचा रंग ओरिजिनल आहे, रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं, शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्ह त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

इतर बातम्या:

Sugarcane Cane : मराठवाड्याच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने..! गावनिहाय नियोजनातून मिटेल का अतिरिक्त ऊसाचा प्रश्न?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...