कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं. पण निर्णय दिल्लीला करायचा असतो. दहा नाव पाठवायची नसतात. दोनच नावं पाठवायची असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. त्यामुळे निर्णय झाला नाही. निर्णय रात्री होणाऱ्या पार्लमेंट्री बोर्डात होईल. सत्यजित कदम (styajit kadam) आणि महेश जाधव (mahesh jadhav) यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.