5

संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोला

संजय राऊतांवर बोलायचं नाही असं आम्ही ठरवलंय. बाकी काही विचारा. त्यांच्यावर बोलून बोलून आपण त्यांना लई मोठा केला. रोज सकाळी प्रवचन. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाला बोलवतात आणि सुरू होतात.

संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोला
संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 1:42 PM

कोल्हापूर: संजय राऊतांवर (sanjay raut) बोलायचं नाही असं आम्ही ठरवलंय. बाकी काही विचारा. त्यांच्यावर बोलून बोलून आपण त्यांना लई मोठा केला. रोज सकाळी प्रवचन. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाला बोलवतात आणि सुरू होतात. त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो हे तुम्हाला माहीत आहे ना. आपल्याला वाटतं दिवा फार मोठा झाला. पण तो विझण्याच्या दिशेने जात असतो, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर केली. महाविकास आघाडी निवडणुकांना घाबरली आहे. ते लोकांना उभं राहू देतील असं वाटत नाही. निवडणूक तिरंगी होईल की दुरंगी होईल हे माहीत नाही, असं सांगतानाच राज्यात पंढरपूर पॅटर्न राबवण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षणावरून त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळल्याने मराठा समाज भडकला आहे. खासदार संभाजी राजेंनी उपोषण केलं. त्यावेळी सरकारने त्यांना मागण्या मार्गी लावण्याचं वेळापत्रक दिलं होतं. त्यावेळी मी संभाजीराजेंना आवाहन केलं होतं की, सरकराने वेळापत्रक पाळलं नाही तर सरकारचा शर्ट पकडावा. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या सोमवारी स्थगन प्रस्ताव मांडणार आहे. स्थगन प्रस्ताव मांडण्यासाठी मी अध्यक्षांशी भांडणार आहे. परवा जनरल बजेटवेळी मी 13 प्रश्न मांडले आहेत. मराठा विद्यार्थ्यांची सरकार निम्मी फी भरणार आहे का? अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 10 लाखाच्या व्याजाचं रिइम्बर्समेंट करणार आहे का? सरकारची ही फसवेगिरी चालणार नाही. या महाराष्ट्रात 32 टक्के मराठा समाज राहतोय त्यांची अशी फसवणूक सुरू आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ओबीसींची फसवणूक सुरू आहे

आरक्षणाच्या मुद्द्याावरूनही ओबीसींची फसवणूक सुरू आहे. सरकारचा कायदा तकलादू आहे. गाफील राहू नका. निवडणुका कधीही लागणार आहे, असं अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले. याचा अर्थ काय? म्हणजे ओबीसींची सरळ सरळ फसवणूक केली जाणार असं दिसतंय, असा दावा त्यांनी केला.

सत्यजीत कदम यांचं नाव पाठवलं

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नाव फायनल झालं का? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर, दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. सत्यजीत कदम आणि महेश जाधव यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला

Maharashtra News Live Update : ट्रॅक्टर मोटारसायकलचा विचित्र अपघात, तरूण दुचाकीसह उसाच्या ट्रॉलीत अडकला

SATARA BIKE ACCIDENT : ट्रॅक्टर मोटारसायकलचा विचित्र अपघात, तरूण दुचाकीसह उसाच्या ट्रॉलीत अडकला

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..