Nashik मध्ये धुलिवंदनाला गालबोट! धुळवड साजरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू, कश्यपी धरणावरील घटना

दोन तासांनंतर स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे.

Nashik मध्ये धुलिवंदनाला गालबोट! धुळवड साजरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू, कश्यपी धरणावरील घटना
नाशकात धुळवडीला गालबोट, महिलेचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 6:25 PM

नाशिक : राज्यात सर्वत्र धूळवड उत्साहात (Holi celebration) साजरी करण्यात आली. मात्र धुळवड साजऱ्या करणाऱ्या एका महिलेचा नाशकात मृत्यू (Nashik Death) झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धुळवड धरणावर साजरी करायला जाणं, या महिलेच्या जीवावर बेतलं आहे. महिला धरात बुडाल्याचं कळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तब्बल दोन तास शोधकार्य सुरु होतं. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर या महिलेचा मृतदेह धरणाच्या (Kashyapi Dam lady drown) पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. नाशिकच्या कश्यपी धरणावर ही घटना घडली आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढलाय. या घटनेमुळे धरणावर धुळवड साजरी करायला गेलेल्यांना मोठा धक्का बसलाय.

किती जण गेले होते?

दोन महिला आणि दोन पुरुष नाशकात धरणावर धुळवड साजरी करायला गेले होते. नाशकातील कश्यपी धरणावर धुळवड साजरी करताना एक महिला धरणाच्या पाण्यात बुडाली. यानंतर महिलेचा शोध सुरु झाला. अखेर याबाबत नंतर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आली.

पोलिस आणि अग्निशनम दलाच्या जवानांनी या महिलेचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. त्यानंतर दोन तासांनी या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेनं धुळवडीसाठी धरणावर जमललेल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. धरणावर धुळवड साजरी करायला जाणं, या महिलेच्या जीवावर बेतलं आहे.

दरम्यान, ही महिला नेमकी कोण आहे? हे कळू शकलेलं नाही. पोलिस आता या प्रकरणी अधित तपास करत आहेत. मात्र एकूणच या घटनेनं सगळे हादरुन गेले आहेत.

संबंधित बातम्या :

परभणीत रंगपंचमीच्या दिवशीच विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

नकली नोटा प्रकरणात एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक, आतापर्यंत सात आरोपींना अटक

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.