Kalyan Crime : कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात नाना पावशे चौक येथे अंकुश सिंग या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. अंकुश सिंग यांनी चव्हाण कुटुंबियाकडून त्यांची जागा डेव्हलपमेंटसाठी घेतली आहे. मात्र या जागेवरून चव्हाण कुटुंब आणि आशुतोष सिंग उर्फ रॉक या दोघांमध्ये वाद सुरू आहे.

Kalyan Crime : कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 7:02 PM

कल्याण : जागेच्या वादातून एका तरुणाने वॉचमनला मारहाण (Beating) करत बिल्डरच्या कार्यालयात घुसून सामानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आशुतोष सिंग उर्फ रॉक असे तोडफोड करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर अंकुर सिंग असे सदर बिल्डरचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आशुतोष सिंग उर्फ रॉक या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. (Vandalism of builder’s office due to land dispute in Kalyan, Incident captured on CCTV)

वॉचमनला मारहाण करीत कार्यालयाची तोडफोड

कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात नाना पावशे चौक येथे अंकुर सिंग या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. अंकुश सिंग यांनी चव्हाण कुटुंबियाकडून त्यांची जागा डेव्हलपमेंटसाठी घेतली आहे. मात्र या जागेवरून चव्हाण कुटुंब आणि आशुतोष सिंग उर्फ रॉक या दोघांमध्ये वाद सुरू आहे. काल सायंकाळच्या सुमारास अंकुर सिंग हे ऑफिस बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास आशुतोष सिंग उर्फ रॉक या कार्यालयाच्या ठिकाणी आला. त्याने वॉचमनला मारहाण करत त्याचा मोबाईल फोडला व त्याच्याकडून चावी हिसकावून घेतली. कार्यालय उघडून त्याने कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

नाशिकमध्ये रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण

नाशिकमध्ये रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील लिलावती हॉस्पिटलमधील काल दुपारी ही घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी फरार आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारासाठी आणेलेल्या मित्रावर उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण करण्यात आली. (Vandalism of builder’s office due to land dispute in Kalyan, Incident captured on CCTV)

इतर बातम्या

Parabhani Suicide : परभणीत रंगपंचमीच्या दिवशीच विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

Pune crime | दागिने खरेदी करायला आल्या आणि अंगठी घेऊन पसार झाल्या! पुण्यातील भामट्या महिला CCTV कॅमेऱ्यात कैद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.