पुण्यात संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच खुसपली कात्री! धक्कादायक घटनेनं खळबळ

पुण्यात संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच खुसपली कात्री! धक्कादायक घटनेनं खळबळ
धक्कादायक घटनेनं एकच खळबळ

त्यानंतर पीडित ग्राहक व आरोपी यांच्यात पैसे देण्यावरून वाद निर्माण झाला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. यामध्ये चिडलेल्या आरोपीने पीडित तरुणाला स्टूल फेकून मारला व रागाने कात्री त्याच्या पोटात खुपसली अशी तक्रार पीडित तरुणाने दिली आहे.

प्राजक्ता ढेकळे

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 18, 2022 | 4:47 PM

पुणे : टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेनं पुणे हादरुन गेलंय. या घटनेत संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच शिवण कामासाठी वापरली जाणारा कात्री खुपसली आहे. यात ग्राहक जखमी झाली आहे. शहरातील चंदननगर परिसरात (Chandannagar area) ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . टेलरिंगच्या दुकानात कपडे अल्टर करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या पोटात कात्री खुपसली (Scissors pierced) आहे. ही घटना चंदननगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत ग्राहक जखमी झाला आहे. अजय प्रभाकर पायाळ (24 वडगाव शेरी ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकाराने चंदननगर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील आनंद पार्क येथील मुज्जमील टेलर शॉप मध्ये घडला आहे.

तर झाल असं की…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुज्जमिल टेलर शॉप येथे काम करतो. पीडित तरुण व त्याचा मित्र त्यांच्याकडे पँट अल्टर करण्यासाठी दुकानात गेले . तिथे त्यांनी पॅन्ट अल्टर करून घेतली. त्यानंतर पीडित ग्राहक व आरोपी यांच्यात पैसे देण्यावरून वाद निर्माण झाला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.

यामध्ये चिडलेल्या आरोपीने पीडित तरुणाला स्टूल फेकून मारला व रागाने कात्री त्याच्या पोटात खुपसली अशी तक्रार पीडित तरुणाने दिली आहे. या घटनेचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

‘भाजपकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे हे पवारांनीही केलं मान्य’, चंद्रकांत पाटील यांचा टोला

Holi Festival : रंग बरसे… अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची लग्नानंतरची पहिली होळी, पाहा फोटो…

Pune hapus mangos : देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातल्या आंब्यांची विक्री, कृषी उत्पन्न बाजार समितीनं जप्त केल्या 42 पेट्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें