Pune hapus mangos : देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातल्या आंब्यांची विक्री, कृषी उत्पन्न बाजार समितीनं जप्त केल्या 42 पेट्या

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Agricultural produce market committee) मात्र ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बनावट हापूसच्या जवळपास 42 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. फौजदारी कारवाईही इशारा देण्यात आला आहे.

Pune hapus mangos : देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातल्या आंब्यांची विक्री, कृषी उत्पन्न बाजार समितीनं जप्त केल्या 42 पेट्या
आंबा, प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:22 PM

पुणे : देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या (Hapus) नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची (Mangoes) विक्री करण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढीस लागले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Agricultural produce market committee) मात्र अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बनावट हापूस आंब्याच्या जवळपास 42 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जात असल्याने ग्राहकांबरोबरच कोकणातील शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे इथून पुढे अशी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाईदेखील केली जाईल, असे बाजार समितीच्या प्रशासकांनी म्हटले आहे.

ग्राहकांमध्ये जागरुकता गरजेची

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कारवाई तर करण्यात येत आहेच. मात्र ग्राहकांनादेखील अशा फसव्या आंब्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. फसव्या आंब्यांच्या या बाजारपेठेत ग्राहकांनी अस्सल कोकणी हापूस कसा ओळखावा, हे आंब्यांच्या व्यापाऱ्याकडून आणि प्रशासकांकडूनच जाणून घेतले आहे. येथील व्यापारी अनिरुद्ध भोसले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागाचे विभागप्रमुख बाबा बिबवे यांनी याविषयीची माहिती दिली.

  • चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.
  • इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.
  • नैसर्गिकरित्या पिकवलेले आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे, पण कठोर असतात.
  • नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे एकसारख्याच रंगाचे दिसतात.
  • पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.
  • हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो.
  • एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे. मात्र जर आंबा तरंगत राहिला तर तो रसायने वापरुन पिकवलेला आहे, असेही काहीजण ओळखतात.
  • शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते.

आणखी वाचा :

Blast : साफसफाईचं काम सुरू असताना Moshi येथील औद्योगिक वसाहतीत स्फोट, 8 जण जखमी

Elon Musk यांचा पुण्यातला Twitter friend, पुतीन यांना आव्हान दिल्याबद्दलही आहे मस्क यांच्या पाठीशी

Pune| पुण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेनी सहकार्‍यांसोबत लुटला धुळवड खेळण्याचा आनंद

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.