AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम

देवगड़ येथील शेतकऱ्यांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी GI टॅग असणारा आंबा बाजारात आणलाय. (hapus mango gi tag)

हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम
केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा
| Updated on: Apr 30, 2021 | 12:27 AM
Share

ठाणे : सध्या आंब्याचे सिझन आहे. मात्र, आजकाल बाजारामध्ये हापूस, केशर आंबा अशा प्रकारच्या प्रसिद्ध आंब्यासारखे बनावट आंबे बाजारात विकले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केमिकलयुक्त आंब्यांपासून लोकांचे संरक्षण व्हावे, त्यासाठी देवगड़ येथील शेतकऱ्यांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी GI टॅग असणारा हापूस आंबा बाजारात आणलाय. (Devgad farmer GI tag on Hapus mango to prevent selling of duplicate mango)

देवगडचा हापूस आंबा ओळखण्यासाठी खास GI tag  

राज्यात कोरोनाची लाट असली तरी फळांचा राजा हापूस आंब्याची मागणी वाढली आहे. कोकणातील या हापूस आंब्याचे अनेक चाहते आहेत. हापूस आंब्याला तर थेट परदेशातूनसुद्धा मागणी आहे. देवगडचा हापूस अंबा असो किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा हे आंबे कितीजरी महागडे असले तरी लोक ते आवडीने खरेदी करतात. मात्र आजकाल या आंब्यासारखेच दिसणारे रसायनयुक्त आंबे बाजारात विकले जात आहेत. हापूस आंब्याच्या नावाखील निकृष्ट दर्जाचे हे आंबे सर्रासपणे विकले जातायत. याला उपाय म्हणून देवगडच्या शेतकऱ्यांनी GI tag नावाची संकल्पना आणली आहे. देवगडच्या खऱ्या हापूस आंब्यांवर जीआय टॅग नावाने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

देवगडचा हापूस अंबा अधिकृत केंद्रावरच विकला जाणार

श्रीराम अभिनव सर्वसाधारण सहकारी सवस्थाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जीआय टॅग असलेले हे हापूस आंबे फक्त शासकीय तत्वावर अधिकृत केंद्रांवर विकले जाणार आहेत.

बनावट आंब्यापासून सावध राहा

तसचे सीताराम राणे यांनी बनावट आमि केमिकलयुक्त आंब्याबद्दल सांगितले आहे. केरळ आणि इतर राज्यात हापूस आंब्याच्या नावाने बनावट आंब्याची विक्री केली जाते असे त्यांनी सांगितले. तसेच आंबे बनावट असतील तर त्यांचा कोणताही वास येत नाही. तसेच ते गरम लागतात अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.

इतर बातम्या :

साखरेचं विक्रमी उत्पादन, कारखान्यांसमोर आता विक्रीचं आव्हान, सरकारची भूमिका काय?

काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या, गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

कापूस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, यावर्षी मिळेल बंपर कमाई, निर्यातीतही होईल 20% वाढ

(Devgad farmer GI tag on Hapus mango to prevent selling of duplicate mango)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.