काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या, गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

महाराष्ट्रातील शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचं चित्र आहे. Suresh Dodake Black Wheat

काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या, गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा
Black Wheat Farming
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 12:58 PM

नाशिक: महाराष्ट्रातील शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचं चित्र आहे. काळा गहू पौष्टिक, औषधी गुणधर्म असल्याने अधिक दर मिळतो, अशा चर्चा सुरु आहेत. जे शेतकरी काळ्या गव्हाची लागवड करण्याच्या विचारत असतील त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. काळ्या गव्हाच्या गावाच्या नावाखाली शेतकर्‍यांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. बियाणे कायद्यात त्या वाणाची नोंदच नाही. महाराष्ट्रात काळ्या गव्हाच्या लागवडीची शिफारस पण नसल्याचे समोर आले आहे. (Wheat Research Centre Kundewadi Chief Suresh Dodake said farmers will be mislead with farming of Black Wheat)

काळ्या गव्हाच्या बियाण्याचा काळाबाजार

अव्वाच्या सव्वा दराने काळ्या गव्हाचे बियाणे विक्रीचा काळाबाजार सुरू आहे. तर काही शेतकरी अधिक दराच्या लोभात काळ्या गव्हाची लागवड करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, भारतीय गहू संशोधन संस्थेत गहू पिकाचे 22 वाण नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत 22 गहू वाणांच्या तुलनेत काळ्या गव्हात पोषकतत्वे ,रोगप्रतिकारकता व उत्पादकता कमी दिसून आले आहे. काळ्या गव्हाच्या वाणासंबंधी राष्ट्रीय स्तरावरून शिफारस नसताना लागवडी केल्या जात असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राकडे शहानिशा केली असता त्यांनी काळ्या गव्हाबद्दल माहिती दिली.

वाणाची नोंद होणं महत्वाचं

भारतीय गहू संशोधन केंद्रामध्ये गव्हाचे एकूण 22 वाण नोंद करण्यात आले आहेत. 1965 च्या बियाणे कायद्याच्या राजपत्र अधिसूचनेनुसार वाणाची नोंद होणे महत्त्वाचे आहे. केंद्राने केलेल्या मूल्यांकन निकषात काळा गहू हा वाण सरस ठरलेला नाही, अशी माहिती गहू संशोधन केंद्र, कुंदेवाडीचे अधीक्षक सुरेश दोडके यांनी दिली.

इतर वाणांच्या तुलनेत कमी उत्पादकता

काळ्या गव्हाची उत्पादकता इतर वाणांच्या तुलनेत कमी आहे. इतर गहू वाणांच्या तुलनेत प्रथिने , लोह, जस्त यांची उपलब्धता अधिक आहे. इतर वाणांच्या तुलनेत रोगप्रतिकारक नाही. उत्पादनपश्चात विक्रीकरीता अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, असं गहू संशोधन केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय.

दरम्यान, काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीदेखील काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळत आहेत.

संबंधित बातम्या:

नांदेडच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, मार्केटमध्येही मोठी मागणी, भावही जास्त, मधुमेहींसाठी आरोग्यदायी पर्याय, वाचा सविस्तर

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा

(Wheat Research Centre Kundewadi Chief Suresh Dodake said farmers will be mislead with farming of Black Wheat)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.