AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा

अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील सुहासआप्पा तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने काळ्या गव्हाची लागवड केली. Akola Akot Blak Wheat

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा
काळा गहू शेती
| Updated on: Feb 10, 2021 | 4:55 PM
Share

अकोला: जिल्हातील अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील सुहासआप्पा तेल्हारकर या युवा शेतकर्‍याने काळ्या गव्हाची लागवड केली. सुहास तेल्हारकर यांनी त्यांच्या दीड एकर शेतात काळ्या गव्हाची लागवड केली आहे. काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीदेखील काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळत आहेत. (Akola Akot Blak Wheat Farming Project by Suhas Telharkar of Aakolkhed)

राजस्थान येथून मागवलं बियाणं

सुहास तेल्हारकर यांनी काळ्या गव्हाचे बी राजस्थान येथून ऑनलाईन पद्धतीनं मागवलं. तेल्हारकर यांनी त्यांच्या शेतात 40 किलो बियाण्याची दीड एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.काळ्या गव्हावर मावा,तुडतुडे येत नाहीत.काळ्या गव्हाच्या जमिनीखाली असलेल्या बुंद्याला नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही.काळ्या गव्हामुळे रक्तदाब,मधुमेह,रक्तपेशी, कॅन्सर,ह्रदयरोग या रोगाच्या उपचारासाठी गुणकारी आहे.

पेरणीचा खर्च कमी

काळ्या गव्हाच्या पेरणीचा खर्च हा सामान्य गव्हापेक्षा कमी आहे. काळ्या गव्हासाठी एकरी 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो. त्यावर कोणत्याही रासायनिक औषधाची फवारणी करण्याची गरज नाही. काळ्या गव्हाच्या एका बुंद्याला 9 ते 10 उंब्या येतात ते सामान्य गव्हापेक्षा जास्त आहेत. गहू हा काळा असून सामान्य गव्हाप्रमाणे तो हिरवा असतो.

सुहास तेल्हारकर यांना दीड एकर शेतात अंदाजे 20 ते 25 क्विंटल गहू एका एकरात होण्याची शक्यता आहे. सुहास तेल्हारकर यांचा आदर्श घेऊन इतरही शेतकर्‍यांनी काळ्या गव्हाची लागवड केल्यास शेतकर्‍याला चांगले दिवस येतील यामध्ये कोणतीही शंका नाही. सुहासआप्पा तेल्हारकर यांनी काळ्या गव्हाची लागवड ही शेतकर्‍यांना बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे. शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त प्रयोग करावा, असं आवाहन केलं आहे.

मधुमेहींसाठी उत्तम पर्याय !

मोहाली इथल्या कृषी विद्यापीठाने गव्हाच्या बियाण्यांचे मिश्रण करून काळ्या गव्हाचे वाण विकसीत केलय. आरोग्यासाठी मोठा लाभदायी असल्याने हा काळा गहू आता सर्वानाच परिचित झालाय. या काळ्या गव्हाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्या सोबतच सर्वसाधारण गव्हापेक्षा या काळ्या गव्हात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने मधुमेही रुग्णाला देखील या गव्हाचे सेवन करता येते. सध्या बाजारात सत्तर ते शंभर रुपये किलो या दराने या गव्हाची विक्री होत असल्याने या गव्हाकडे शेतकरी आकर्षित झालेत.

काळ्या गव्हाची कशी घ्यायची काळजी?

गहू पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया जैविक निविष्ठांची गोकृपामृत फवारणी दोन वेळा करावी लागते. दोन्ही वेळा दूध गूळ अंडी यांच्या मिश्रणाची फवारणी केल्यास अजून उत्तम, तर या गव्हाची उगवण झाल्यावर एकदा कोळपणी करावी लागते. पाण्याच्या साधारणतः पाच पाळ्या द्याव्या लागतात. आवळा पावडरची फवारणी केल्यास या गव्हावर कुठल्याही कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याचे या शेतकऱ्यांने सांगितले.

संबंधित बातम्या:

नांदेडच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, मार्केटमध्येही मोठी मागणी, भावही जास्त, मधुमेहींसाठी आरोग्यदायी पर्याय, वाचा सविस्तर

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून भाजपची ‘एक्झिट’?

(Akola Akot Blak Wheat Farming Project by Suhas Telharkar of Aakolkhed)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.