Blast : साफसफाईचं काम सुरू असताना Moshi येथील औद्योगिक वसाहतीत स्फोट, 8 जण जखमी

Blast : साफसफाईचं काम सुरू असताना Moshi येथील औद्योगिक वसाहतीत स्फोट, 8 जण जखमी
मोशीतील स्फोट झालेले ठिकाण
Image Credit source: Express

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) टाउनशिपमधील मोशी (Moshi) परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट (Blast) झाला. यात आठजण किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 17 मार्चरोजी एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये कमी तीव्रतेचा हा स्फोट झाला.

प्रदीप गरड

|

Mar 18, 2022 | 1:26 PM

पुणे : जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) टाउनशिपमधील मोशी (Moshi) परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट (Blast) झाला. यात आठजण किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 17 मार्चरोजी एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये कमी तीव्रतेचा हा स्फोट झाला. औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी काही ठिकाणी साफसफाईचे काम सुरू असताना ही घटना घडली. या प्रकारानंतर लगेचच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत युनिटमध्ये काम करणारे किमान आठ जण भाजले, असे अग्निशामकच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. गंभीर दुखापत नसल्याची माहिती मिळत आहे. (Blast at metal scrap unit)

आठ जणांपैकी दोन जण 20 ते 25 टक्के भाजले

सुदैवाने हा स्फोट झाला, त्यावेळी खूप जास्त कामगार नव्हते. मात्र आठ हा आकडाही जास्तच आहे. या आठ जणांपैकी दोन जण 20 ते 25 टक्के भाजले आहेत. अग्निशामक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी काही साफसफाईचे काम सुरू होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.

‘तेलाचे बॅरल गरम पाण्यात टाकून ते साफ करत असताना अपघात’

“युनिट औद्योगिक भंगार हाताळते. वापरलेले तेलाचे बॅरल गरम पाण्यात टाकून ते साफ करत असताना हा अपघात झाला. चुलीवर पाणी तापवले जात होते. बॅरलमधील काही तेल भट्टीच्या ज्वालाच्या संपर्कात आल्याने अचानक आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. काही जण भाजले आहेत,” असे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले.

गुन्हा दाखल

मुसा मोहम्मद (65), शिवराज बोगवाड (37), महादू पाडुळे (45), सुरेश बोगवाड (26), पिराज बोगवाड (26), मल्लू बोईगवाड (45), माधव बोगवाड (28) आणि बालाजी बोगवाड (38) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत युनिटच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा :

Elon Musk यांचा पुण्यातला Twitter friend, पुतीन यांना आव्हान दिल्याबद्दलही आहे मस्क यांच्या पाठीशी

Pune| पुण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेनी सहकार्‍यांसोबत लुटला धुळवड खेळण्याचा आनंद

Pune Crime | माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान, दहावीच्या परीक्षेला मुकणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें