Yavatmal Cylinder Blast | Arni तालुक्याच्या आयता गावात सिलिंडरचा स्फोट, 2 जणांचा मृत्यू

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 2 जण ठार (Died) झाले आहेत. आयता गावातील जयस्वाल नामक व्यक्तीच्या घरी गॅस सिलेंडरचा हा भीषण स्फोट झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Mar 09, 2022 | 6:05 PM

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 2 जण ठार (Died) झाले आहेत. आयता गावातील जयस्वाल नामक व्यक्तीच्या घरी गॅस सिलेंडरचा हा भीषण स्फोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. तर या आगीत आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसरात आगीचे, धुराचे लोट पाहायला मिळाले. आगीच्या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची दाहकता लक्षात येते. स्फोटानंतर गावकऱ्यांची धावाधाव सुरू झाली. अनेकांनी मदतीसाठी या कुटुंबाकडे धाव घेतली. मात्र दुर्दैवाने दोन जण ठार झाले. स्फोटाच्या भीषणतेने घराचे छप्परही उडाले. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पत्र्याचे छप्पर होते. मात्र स्फोटानंतर ते उडाले, सर्व गृहोपयोगी साहित्य जळाल्याचे दिसते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें