Pune Crime | माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान, दहावीच्या परीक्षेला मुकणार

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला करण्यात आल्याने चार दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. दहावीच्या परीक्षा सुरु असल्याने काळजी व्यक्त केली जात होती

Pune Crime | माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान, दहावीच्या परीक्षेला मुकणार
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 9:13 AM

पुणे : एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात (Knife Attack) गंभीर जखमी झालेली अल्पवयीन तरुणी (Minor Girl Student) परीक्षेला मुकली. संबंधित विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देण्यास अपात्र ठरली. त्यामुळे तिचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीमध्ये तरुणीवर चाकूहल्ला झाला होता. गंभीर जखमी झाल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे डॉक्टरांनी परीक्षा देण्यास परवानगी नाकारली. या तरुणीला परीक्षा देण्यास लेखनिकही देण्याची तयारी दाखवण्यात आली होती, परंतु डॉक्टरांकडून तिला संमती देण्यात आलेली नाही.

चाकू हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर

जखमी विद्यार्थिनीला सुरुवातीला पुण्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.  या चाकू हल्ल्यात मुलीच्या पोटाला, हाताला गंभीर जखम झाली. त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस स्थाानकात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरांनी परवानगी नाकारली

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला करण्यात आल्याने चार दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. दहावीच्या परीक्षा सुरु असल्याने काळजी व्यक्त केली जात होती. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे डॉक्टरांनी परीक्षा देण्यास परवानगी नाकारली. या तरुणीला परीक्षा देण्यास लेखनिकही देण्याची तयारी दाखवण्यात आली होती, परंतु डॉक्टरांकडून तिला संमती देण्यात आलेली नाही.

कुटुंबीयांकडून संताप

सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्याचा पीडित विद्यार्थिनीच्या नातलगांनी निषेध केला आहे. तसंच जखमी झालेल्या मुलीच्या मदतीला शाळेतील सुरक्षा रक्षकांनी मदत करायला हवी होती, असंही म्हटलंय. या धक्कादायक घटनेनंतर आता आंदोलन छेडण्याचा इशारा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

परभणीत अज्ञात कारणावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या, एक महिला गंभीर जखमी

बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, तलवारीने वार, पती-पत्नी जखमी

वाळू तस्कराचा हल्ला, गाडीचे दरवाजे डंपरमध्ये घुसले, महिला तहसीलदार वाहनात अडकून

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.