AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुझ स्ट्रेटवर इराणचा नवा डाव, केवळ याच देशांना मिळणार फायदा, जागतिक संकटात वाढ

इराण होर्मुझचा ताबा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. आता इराण या मार्गावर नवीन तंत्र लागू करण्याचा डाव टाकणार आहे. त्यामुळे जागतिक तेल बाजारात संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

होर्मुझ स्ट्रेटवर इराणचा नवा डाव, केवळ याच देशांना मिळणार फायदा, जागतिक संकटात वाढ
Hormuz Strait
| Updated on: May 16, 2026 | 11:06 PM
Share

Hormuz Strait: इराण आता होर्मुझ स्ट्रेटमध्ये समुद्र वाहतूकी संदर्भात नवाच डाव खेळण्याच्या तयारीत आहे. इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या प्रमुखांनी सांगितले की लवकरच होर्मुझमध्ये नवा रुट मॅनेजमेंट सिस्टीम लागू केली जाणार आहे. या अंतर्गत त्याच देश आणि व्यापारी जहाजांना या मार्गाचा वापर करता येणार आहे जे इराणला पाठिंबा देतील. इराणने हे देखील स्पष्ट केले आहे की विशेष सेवांसाठी आवश्यक शुल्क देखील आकाराले जाणार आहे. होर्मुझ स्ट्रेट हा जगातील एक सर्वात महत्वाचा तेल वाहतूकीचा मार्ग आहे. यामुळे इराणच्या या निर्णयाचा परिणाम ग्लोबल एनर्जी मार्केटवर पडणार आहे.

सहकारी देशांना होणार फायदा

रॉयटर्सच्या वृत्तानुसार इराणचे नवीन तंत्र लागू झाल्यानंतर समुद्र जहाजांसाठी वेगळा रुट मॅनेजमेंट सिस्टीम असेल. यात केवळ त्याच देश आणि व्यापारी जहाजांना प्राथमिकता दिली जाईल जे इराणला सहकार्य करतील. इराण म्हटले आहे की जे ऑपरेटर तथाकथित फ्रीडम प्रोजेक्टशी जोडलेले असतील त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. मात्र, इराण अजून या नव्या सिस्टीमची संपूर्ण माहिती जगासमोर आणलेली नाही. असे म्हटले जात आहे की येत्या काही दिवसात याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

इराणने काय म्हटले ?

इराणचे परराष्ट्र मंत्री Abbas Araghchi यांनी सांगितले की जे देश इराणच्या विरुद्ध युद्धात सामील नसतील त्यांची जहाजे स्ट्रेट मधून पार होतील. मात्र, यासाठी त्यांना इराणच्या नौदलाची समन्वय साधावा लागेल.त्यांनी सांगितले की सध्याची स्थिती खूप जटील बनलेली आहे. इराणने अमेरिकेवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे आणि सांगितले की वॉशिंग्टनमधून विरोधाभासी संदेश मिळत आहेत.

चर्चेतून तोडगा निघण्याची आशा

इराणने म्हटले आहे की ते राजकीय वाटाघाटी तयार आहेत आणि चर्चेद्वारे परिस्थिती सामान्य होण्यास त्यांचे प्राधान्य आहे. इराणला आशा आहे की भविष्यात कराराच्या दिशेने प्रगती होईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली जाईल. इराणने चीनसारख्या देशांच्या मध्यस्थीचेही स्वागत केले आहे. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावामुळे या क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक