Rohit Pawar | सरकार संवादात अपयशी? मराठा आंदोलनावर रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, म्हणाले….
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी 30 मेपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत मोठी दिरंगाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. “मराठा समाजाला वेळेत कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवे होते, मात्र अद्यापही अनेकांना प्रमाणपत्र मिळत नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सर्व समाजघटक सध्या अडचणीत असल्याचे म्हटले. “मराठा समाज, ओबीसी समाज तसेच इतर समाजातील शेतकरी सध्या संकटात आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेलची कमतरता, वाढते इंधन दर आणि खतांच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सरकारला आंदोलन टाळण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला. “सरकारने आंदोलन होण्याची वेळ येऊ न देता संबंधित समाजाशी चर्चा करून तोडगा काढणं गरजेचं आहे. राज्य आणि देश सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. मनोज जरांगे यांच्या नव्या आंदोलनाच्या घोषणेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: May 16, 2026 05:05 PM
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय