Manoj Jarange Patil | कुणबी प्रमाणपत्रावरून सरकारला घेरलं! मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला. “राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, मग मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का दिलं जात नाही?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देताना सरकारकडे बोट दाखवत आहेत. “मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग प्रमाणपत्र न मिळण्याला त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे,” असेही ते म्हणाले. त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत तातडीने कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी करत, आंदोलनाच्या तारखेपूर्वी सरकारने निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
दरम्यान, 30 तारखेला अंतरवाली सराटीत मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही जरांगे यांनी केली. “जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थानांच्या गॅझेटच्या आधारेही जीआर काढण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी काही समाजघटकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. “मी समाजाशी कधीही बेईमानी करणार नाही. उपाशी मरेन पण खोटं बोलून पैसे कमवणार नाही,” असे म्हणत मराठा आरक्षणासाठी आता सर्वात मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...

