मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, तरी येण्यास मज्जाव? NCP मध्ये नेमकं काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत सुनील तटकरे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत सुनील तटकरे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची नावं राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयात आहेत, इतकेच नाही तर त्यांचे पदही पाट्यांवर लिहिले आहे.
अलीकडेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांना या दिल्ली कार्यालयात येण्यास मज्जाव असल्याचं सांगितलं. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणावर अद्याप कोणत्याच प्रमुख नेत्याने याबाबत स्पष्टपणे सांगितलेले नाही. सुनील तटकरे यांना पत्रकारांनी शरद पवारांशी भेट तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीबाबत विचारता त्यांनी सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘या विषयावर बोलण्याची योग्य वेळ येईल तेव्हा बोलू… आम्ही सर्व प्रमुख चर्चा करू, नंतर काय ते कळेलच तुम्हाला’.
Published on: May 16, 2026 03:33 PM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

