AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar : शरद पवार पावसात भिजूनही NCP चे 54 आमदार, गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं

विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येईल याचा विचार शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलंय.

Gopichand Padalkar : शरद पवार पावसात भिजूनही NCP चे 54 आमदार, गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
गोपीचंद पडळकर यांचं शरद पवार यांच्यावर टीकास्त्रImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 8:39 PM
Share

सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येईल याचा विचार शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलंय.शरद पवार यांनी एकच विचार करावा, कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येऊ हे त्यांनी ठरवाव, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली आहे. पडळकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि सांगलीतील जिल्हा बँकेच्या राजकारणावरुन देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत, असं देखील पडळकर म्हणाले.

शरद पवारांनी भाजपच्या आमदारांचा विचार करु नये

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल असे शरद पवार आणि त्याचे नेते करत आहेत. पण, त्यांनी भाजपच्या आमदारांचा विचार करू नये. कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येईल याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करावा, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पावसात भिजून देखील 54 आमदार निवडून आले

हे सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार महाविकास आघाडीतील नेते असतील, शरद पवार असतील ते महाराष्ट्रातील जनतेला सांगतात की भाजप सत्तेत येणार नाही. आम्ही पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असं ते म्हणतात. मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले. तर, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

भाजपनं 4 राज्यात सत्ता मिळवली

राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगतात की महाविकास आघाडी पुढचे 25 वर्ष सत्तेत येईल. पण, त्यांनी लक्ष्यात घ्यावे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. सध्या चार राज्यात भाजपने सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपण काय करतो याचा विचार करावा भाजपच्या आमदारांचा करू नये, असा टोला देखील पडळकर यांनी लगावला.

सांगली जिल्हा बँक प्रकरणी रस्त्यावर उतरु

सांगली जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक आहे. जर बँकेत स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्याचा विचार करून कर्ज दिली जात असतील आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असतील. तर, या विरुद्द आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

इतर बातम्या :

गुलाम नबी आझाद सोनिया गांधीच्या भेटीला! 5 राज्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

संजय राऊतांसह 6 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.