
मुंबई : केस (Hair) कितीही लहान, लांब, कुरळे किंवा सरळ असोत, पण केस चमकदार, जाड आणि निरोगी दिसावेत म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. केसांच्या समस्या दूर करण्याचा दावा करणारी सर्व उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, ती महाग आहेत तसेच केमिकलही (Chemical) त्यामध्ये असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा केसांना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. त्यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. जर तुम्हाला खरोखरच तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील तर महागड्या उत्पादनांकडे जाण्याची गरज नाही, अशा अनेक नैसर्गिक (Natural) गोष्टी आहेत ज्या तुमच्या केसांचे पोषण करू शकतात आणि त्यांना निरोगी बनवू शकतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.
उष्णता आणि रासायनिक उत्पादने केराटिनचे नुकसान करतात आणि केस कमकुवत करतात. यामुळे केस झपाट्याने गळू लागतात, मटारच्या प्रोटीनमध्ये असलेले अमीनो अॅसिड केसांचे नुकसान टाळते. ते दुरुस्त करण्याचे काम करते.
तुमच्या केसांसाठी केराटिनचे उत्पादन मटारच्या प्रोटीनमध्ये असलेल्या अमीनो ऍसिडच्या मदतीने वाढवता येते. केराटिन तुमच्या केसांची वाढ वाढवते. आजकाल केराटिन उपचार सलूनमध्ये देखील दिले जातात, परंतु ते केमिकलवर आधारित असण्याची शक्यता असते.
प्रथिनाव्यतिरिक्त लोह, झिंक आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक देखील मटारमध्ये आढळतात जे कोलेजन निर्मिती, केसांची वाढ, कोंडा कमी करण्यास मदत करतात.
केस हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. त्यामुळे केस तुटण्याची आणि फाटण्याची शक्यताही कमी होते. मटार प्रोटीन केसांना हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणाची समस्या दूर करते.
आपण जाणून घेतले आहे की, वाटाणा आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर आहे. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये वाटाण्याचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहून वजन कमी करायचे आहे? मग हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा!
Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!