AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी मसाज करून मिळवा चेहऱ्यावर फेशियलसारखा ग्लो

चेहऱ्याला मसाज केल्याने रक्तभिसरण वाढते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्यासोबतच त्वचा निरोगी राहते. चेहऱ्याला मसाज केल्यामुळे त्वचेवर चमक येतेच पण त्याबरोबर ताण कमी होतो.

घरच्या घरी मसाज करून मिळवा चेहऱ्यावर फेशियलसारखा ग्लो
| Edited By: | Updated on: Nov 08, 2024 | 1:31 PM
Share

Face Massage At Home Tips : आपला चेहरा सुंदर दिसावा असे कुठल्याही महिलेला आणि मुलीला वाटणे स्वाभाविक आहे. सुंदर आणि ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाणे खर्चिक वाटते. त्यामुळे चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी घरच्या घरी चेहऱ्याच्या मसाज हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. घरच्या घरी फेशियल मसाज कसा करायचा आणि यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते आपण जाणून घेऊ.

चेहरा स्वच्छ करा : मसाज करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ करून घ्या. जेणेकरून चेहऱ्यावरील सर्व धूळ घाण निघून जाईल आणि त्यानंतर मालिश केल्याने तेल किंवा क्रीम त्वचेमध्ये व्यवस्थित शोषले जाईल.

मसाज करण्यासाठी तेल किंवा क्रीमचा वापर करा : खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल याचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे तुमची त्वचा जर तेलकट असेल, तर एलोवेरा जेल किंवा हलके मॉइश्चरायजर देखील वापरू शकता यामुळे त्वचेचे पोषण आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.

कसे कराल मालिश?

  • गालाचा मसाज: हलक्या गोलाकार हालचालींमध्ये गालांचा मसाज करा. त्यामुळे त्वचेचे रक्तभिसरण वाढेल आणि गालावर नैसर्गिक चमक येईल.
  • कपाळाचा मसाज: कपाळावर बोटांनी मसाज करा. यामुळे कपाळावरील सुरकुत्या कमी होतात आणि तणावही कमी होतो.
  • डोळ्यांभोवती मसाज करा: डोळ्याच्या आजूबाजूला आणि डोळ्याखाली हलक्या हाताने मसाज करा. डोळ्याजवळची त्वचा नाजूक असते, त्यामुळे तिथे अतिशय हलक्या हाताने मसाज केला तर काळी वर्तुळे आणि सूज कमी होण्यास मदत होते.
  • जबड्याचा आणि हनुवटीचा मसाज : हनुवटी आणि जबड्याला खालपासून वरपर्यंत हलक्या हाताने मालिश करा. यामुळे त्वचा घट्ट होते आणि दुहेरी हनुवटी कमी होते.
  • टॅपिंग मसाज: मसाज झाल्यानंतर आपल्या बोटांनी हलकी टॅपिंग करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा घट्ट होते. टॅपिंग मसाजमुळे त्वचेला ताजे वाटते. चमक देखील येते.
  • चेहऱ्याला आराम द्या : मसाज केल्यानंतर चेहऱ्याला पाच ते दहा मिनिटे आराम द्या. त्यामुळे तेल किंवा क्रीम त्वचेमध्ये व्यवस्थित शोषली जाईल. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

मसाज करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मसाज करताना जास्त जोर लावू नका, हलक्या हाताने मसाज करा. दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला मसाज करणे पुरेसे आहे. मसाजदरम्यान शांत वातावरण असावे. तुम्ही यावेळी हलक्या स्वरुपाचे संगीतही ऐकू शकता जेणेकरून मनशांती लाभेल. मसाज केल्यानंतर शक्यतो उन्हात जाणे टाळा. कारण लगेच उन्हात गेल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.