AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुक्ष केसांच्या समस्या आणि केस गळतीही होईल कमी, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !

प्रत्येकाला गडद आणि दाट केस आवडतात. दाट केस आपले व्यक्तिमत्त्व वाढवण्याचे कार्य करतात.

रुक्ष केसांच्या समस्या आणि केस गळतीही होईल कमी, 'हे' घरगुती उपाय ट्राय करा !
| Updated on: Mar 23, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई : प्रत्येकाला गडद आणि दाट केस आवडतात. दाट केस आपले व्यक्तिमत्त्व वाढवण्याचे कार्य करतात. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे केसांची काळजी घेणे थोडे अवघड झाले आहे. यामुळे कोरडेपणा, रुक्ष केस, कोंड्या समस्या, केस गळणे आणि केस पांढरे होणे, या समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न येतो की, ही केस गळती कमी करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात  (If you are suffering from hair loss follow these tips)

-जर आपले केस खूप वेगाने गळत असतील तर मेथी दाणे आपले केस गळणे थांबवतेच परंतु नवीन केसांना वाढण्यास देखील मदत करेल. मेथीमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-सी, लोह, पोटॅशियम असे घटक आढळतात. यामुळे आपल्या केसांची मुळे मजबूत करण्यासाठी, त्यांच्या वाढीस मदत होते.

-रुक्ष आणि निर्जीव केस कोणालाच आवडत नाहीत. जर, तुमचेही केस रुक्ष असतील आणि तुम्हालाही तुमच्या केसांची चमक वाढवायची असेल, तर आठवड्यातील दोन दिवस, झोपण्यापूर्वी केसांच्या स्काल्पमध्ये आणि मुळांमध्ये मेथीच्या तेलाने चांगला मसाज करा.

-डोक्यातील कोंडापासून मुक्त होण्यासाठी, मेथी तेल व गोक्षुर समान प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये तेल आणि मध मिसळ. ही पेस्ट हेअर मास्क म्हणून लावा. किमान एक तास तरी हा मास्क राहू द्या, नंतर शॅम्पूने केस धुवा

-केस गळती कमी करण्यासाठी रात्री मेथी दाणे पाण्यात भिजवा. किती मेथी दाणे घ्यावी हे आपल्या केसांच्या लांबीवर अवलंबून आहे.

-सकाळी त्याची पेस्ट बनवताना त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे केसांमध्ये लावा आणि नंतर केस धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून दोनदा केसांना लावू शकता.

-केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल.

संबंधित बातम्या : 

Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!

(If you are suffering from hair loss follow these tips)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...