Katrina Kaif : ‘मॅक्रोबायोटिक डाएट’ आणि ‘स्किन केअर रूटीन’ चा अवलंब करून कॅटरिना कैफ बनली ‘ब्युटी आयडॉल’, तुम्ही देखील वापरू शकता तिच्या या सोप्या ब्युटी टिप्स!

| Updated on: Jun 23, 2022 | 9:22 PM

कॅटरीना कैफ ला पाहिले की, प्रत्येक युवतीला तिच्यासारखीच आपलीही स्कीन व्हावी असे वाटते. पण त्यासाठी ती काय करत असेल, नक्कीच महागडे उत्पादने वापरत असेल असा समज प्रत्येकीचा होतो. परंतु, तसे नसून, कॅटरीना तिच्या सुंदर त्वचेसाठी अगदी सोप्या ब्युटी टिप्स फॉलो करते.

Katrina Kaif : ‘मॅक्रोबायोटिक डाएट’ आणि ‘स्किन केअर रूटीन’ चा अवलंब करून कॅटरिना कैफ बनली ब्युटी आयडॉल, तुम्ही देखील वापरू शकता तिच्या या सोप्या ब्युटी टिप्स!
‘चॉकलेट सिस्ट’मुळे येते मासिकपाळीत अनिमितता
Image Credit source: tv9
Follow us on

कॅटरीना कैफची त्वचा (Katrina Kaif’s skin) इतकी ग्लोइंग आणि सुंदर आहे की, कधीकधी तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते. कॅटरीनाची त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. तिच्या चेहऱ्यावर म्हातारपणाचे (Aging on the face) कोणतेही चिन्ह दिसत नाही. याच कारणामुळे ती बहुतांश मुलींसाठी ‘ब्युटी आयडॉल’ बनली आहे. डागविरहीत चेहरा आणि त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी कॅटरिनाही तिच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढते. जर तुम्हालाही कॅटसारखी त्वचा राखायची असेल आणि तिच्यासारखी चमक आणायची असेल, तर तिचे सौंदर्य रहस्य हे आहे. कॅटरीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची त्वचा निरोगी आणि ताजी ठेवण्यासाठी ती तिच्या त्वचेवर ओट्स आणि मधापासून बनवलेला फेस पॅक वापरते. याशिवाय, झोपेतून उठल्यानंतर ती तिचा चेहरा बर्फाच्या पाण्यात (Face in ice water) बुडवते. तुम्हीही कॅटरिनाच्या या सोप्या आणि घरगुती ब्युटी टिप्स वापरून, तुमची स्कीन ग्लोईंग बनवू शकता.

बर्फाच्या पाण्यात बुडवते चेहरा

कॅटरिना रोज सकाळी उठल्यावर तिचा चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवते. त्यासाठी ती एका भांड्यात पाणी घेते आणि त्यात भरपूर बर्फ टाकते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी ती गुलाबपाणी वापरते. त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी ती दर 15 दिवसांनी क्लीनझींग करते. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ केल्यानंतर नाइट क्रीम वापरते.

मॅक्रोबायोटिक आहार

कॅटरिनाचे असे मत आहे की, त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी हेल्दी डाएट देखील खूप महत्वाचे आहे. यासाठी ती मॅक्रोबायोटिक डाएट फॉलो करते. मॅक्रोबायोटिक आहारामध्ये तपकिरी तांदूळ, बीन्स, सीफूड आणि भाज्या यांचा समावेश होतो. याशिवाय त्यात भरपूर फायबर असल्याने, हे तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच वजनही संतुलित ठेवते. कॅट दर 2 तासांनी ताज्या उकडलेल्या भाज्या आणि फळे देखील खाते. याशिवाय ती कार्ब्स टाळते. कॅटरिनाच्या आहारात बेरी आणि व्हाईट ग्रास पावडर सारख्या सप्लिमेंट्सचाही समावेश असतो.

भरपूर पाणी पिते

त्वचा आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कॅटरिना भरपूर पाणी पिते आणि इतर द्रव पदार्थ घेते. 4 ग्लास पाणी पिऊन ती सकाळची सुरुवात करते. पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्मला चालना मिळते, तसेच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. याशिवाय कतरिना नियमित वर्कआउट करते. कॅटरिनाच्या या सोप्या आणि साध्या ब्युटी टिप्स वापरून तुम्हीही तुमची त्वचा ग्लोईंग आणि सुंदर बनवू शकता.