AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसमध्ये भूकंप, सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचा होणार भाजपात प्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसमध्ये भूकंप, सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचा होणार भाजपात प्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 17, 2025 | 8:04 PM
Share

राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला.  मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला हे यश टिकवता आलं नाही. राज्यात महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं. राज्यात महायुतीचे उमेदवार तब्बल 232 जागांवर विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता होती. या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. याचा फटका काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा सर्वच पक्षांना बसला. दरम्यान अजूनही हे पक्ष प्रवेशच सुरूच आहेत, आता राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत पक्षाची साथ सोडली आहे, त्यामध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तो म्हणजे आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.  हिंगोली जिल्ह्यात हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.  प्रज्ञा सातव या माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते अशी राजीव सातव यांची ओळख होती.  मात्र आता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यानंतर हा मराठवाड्यात काँग्रेससाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसह प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, काही कार्यकर्ते  आजच मुंबईमध्ये दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. हा राज्यात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी