प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरियाच्या वडिलांचे निधन, अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट
Dino Morea Father Death : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डिनो मोरियाचे वडील रॉनी मोरिया यांचे निधन झाले आहे. डिनोने सोशल मिडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डिनो मोरियाचे वडील रॉनी मोरिया यांचे निधन झाले आहे. डिनोने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ‘राज’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता डिनो मोरिया हा त्याच्या वडिलांच्या खूप जवळचा होता. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्याने वडिलांचे निधन कधी आणि कसे झाले याबद्दल अभिनेत्याने माहिती दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉनी मोरिया हे इटालियन होते, तर डिनोची आई भारतीय आहे. भारतात येऊन बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी डिनोने 11 वर्षे इटलीमध्ये घालवली. आता वडिलांच्या निधनानंतर डिनोने सोशल मीडियावर त्याच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट वाचून त्याचे चाहते भावनिक झाले आहेत.
डिनोची पोस्ट काय आहे?
डिनो मोरियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रत्येक दिवस आनंदाने जगा, दररोज हसत राहा आणि तुम्ही जे काही करता ते मनापासून करा. व्यायाम करा, निसर्गाचा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या, चांगले अन्न खा, पर्वत आणि समुद्र किनारी फिरा. कठोर मेहनत करा, सर्वांसोबत हसत खेळत रहा, सर्वांवर प्रेम करा अशा सर्व गोष्टींचा आनंद घ्या. माझ्यासाठी, हे सर्व एकाच व्यक्तीमध्ये साकारले होते; माझे मार्गदर्शक, माझे नायक, माझे वडील. बाबा, मला हे जीवनाचे धडे शिकवल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला सर्वांना तुमची खूप आठवण येत आहे.
View this post on Instagram
‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ 4 मध्ये झळकणार
डिनोने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मला खात्री आहे की तुम्ही कुठेही असलात तरी, तुम्ही लोकांना एकत्र केले असेल, सर्वजण तुमच्यासोबत हसत आणि नाचत असतील. जोपर्यंत आपण पुन्हा भेटूत नाहीत तोपर्यंत असेच आनंदी राहा. लव्ह यू पापा.’ दरम्यान, डिनो मोरियाने अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटात काम केले होते. आता तो अमेझॉन प्राइमची लोकप्रिय मालिका ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ च्या सीझन 4 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
