IND vs SA 4th T20i : दुखापत की डच्चू? शुबमन गिल चौथ्या सामन्यातून आऊट;संजूचं कमबॅक!
Shubman Gill India vs South Africa 4th T20i : शुबमन गिल याला दुखापतीमुळे चौथ्या टी 20i सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे संजू सॅमसन याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह संजूचं दीड महिन्यानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या आणि निर्णायक टी 20i सामन्याला धुक्यांमुळे विलंब झाला आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र लखनौतील धुक्यांमुळे टॉसला विलंब झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर टॉस किती वाजता होणार? हे निश्चित केलं जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याला दुखापतीमुळे चौथ्या टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,शुबमन गिल याला मंगळवारी 16 डिसेंबरला सराव करताना पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनला लखनौतील एकाना स्टेडियममध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. मात्र शुबमनला नक्की दुखापत झालीय की टीम मॅनेजमेंटने वाढत्या दबावामुळे त्याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर केलंय? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे.
शुबमनची निराशाजनक कामगिरी
शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मानेला दुखापत झाली होती. शुबमनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतून टीम इंडियात कमबॅक केलं. मात्र शुबमन पहिल्या दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. शुबमनने पहिल्या 2 सामन्यात एकूण 21 धावा केल्या. त्यानंतरही शुबमनला तिसऱ्या सामन्यासाठी संधी देण्यात आली. तर शुबमनला तिसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही.
तर दुसऱ्या बाजूला शुबमनमुळे संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर बसावं लागलं. त्यामुळे शुबमन धावा करत नसूनही त्याला वारंवार संधी दिली जात असल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंटने शुबमनला दुखापतीच्या नावावर शुबमनला बाहेर केलं नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शुबमन चौथ्या टी 20i सामन्यातून आऊट
🚨 BAD NEWS FOR INDIA 🚨
– Shubman Gill is likely to miss the 4th T20I today due to an injury to his toe. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/fFXCaF8QRm
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2025
संजू सॅमसन याला संधी!
दरम्यान शुबमनला बाहेर व्हावं लागल्याने आता प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संजूचं अखेर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे. संजूने अखेरचा टी 20i सामना हा 31 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला होता. त्यानंतर आता संजू पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे.
