Skin Care : मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि मध अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Nov 12, 2021 | 10:05 AM

मुरुमाचा प्रामुख्याने त्वचेवर आणि टाळूवर परिणाम होतो. तुम्हाला मुरुमाचे प्रकार देखील माहित असणे आवश्यक आहे, कारण मुरुमाचे अनेक प्रकार आहेत. त्याच आधारावर मुरुमावर उपचार करणे देखील आवश्यक आहे. मुरुमाचे तीन प्रकार आहेत जे चेहऱ्याच्या काही भागांवर परिणाम करू शकतात.

Skin Care : मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि मध अत्यंत फायदेशीर!
वाढत्या वयाच्या प्रभावापासून स्वतःला वाचवायचे असेल तर पस्तिशीनंतर अशी घ्या त्वचेची काळजी
Follow us on

मुंबई : मुरुमाचा प्रामुख्याने त्वचेवर आणि टाळूवर परिणाम होतो. तुम्हाला मुरुमाचे प्रकार देखील माहित असणे आवश्यक आहे, कारण मुरुमाचे अनेक प्रकार आहेत. त्याच आधारावर मुरुमावर उपचार करणे देखील आवश्यक आहे. मुरुमाचे तीन प्रकार आहेत जे चेहऱ्याच्या काही भागांवर परिणाम करू शकतात. मुरूमामुळे आपली त्वचा अधिक खराब होते. विशेष म्हणजे मुरूमाचे डाग पडतात. हे टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करणे आवश्यक आहे.

आपल्या चेहऱ्यावरील मुरूम लाल रंगाचा असेल तर आपण या मुरूमासाठी खास लिंबू आणि मधाचा फेसपॅक वापरला पाहिजे. ज्यामुळे त्वचेवरील मुरूम जाण्यास मदत होते. यासाठी आपल्याला चार चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मध लागेल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी मध आणि लिंबू मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. कडुलिंबाचा वापर सामान्यतः त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी केला जातो. मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. या पेस्टमध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हळदीला सर्व मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. कारण ते अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. एक चमचा कोरफडचा गर आणि हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते. एक चमचा जायफळ आणि एक चमचा कच्चे दूध एकत्र करून पेस्ट लावा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Lemon and honey are beneficial for acne)