Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे...
नारळ पाणी

बर्‍याच वेळा मधुमेह असणारे रूग्ण नैसर्गिकरित्या गोड असणाऱ्या फळांचे सेवन करणे देखील टाळतात. कारण, या फळांच्या सेवनाने त्यांच्या रक्तातील साखर पातळीत आणखी वाढ होईल, अशी भीती त्यांना असते.

Harshada Bhirvandekar

| Edited By: Rohit Dhamnaskar

Feb 27, 2021 | 7:11 AM

मुंबई : मधुमेह रूग्णांना गोड पदार्थांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो. विशेषत: साखर युक्त पेय अशा रुग्णांना वर्ज्य असतात, जेणेकरून त्यांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. यामुळे, बर्‍याच वेळा मधुमेह असणारे रूग्ण नैसर्गिकरित्या गोड असणाऱ्या फळांचे सेवन करणे देखील टाळतात. कारण, या फळांच्या सेवनाने त्यांच्या रक्तातील साखर पातळीत आणखी वाढ होईल, अशी भीती त्यांना असते. अशाच प्रकारचे गोंधळ बर्‍याचदा नारळाच्या पाण्याच्या बाबतीतही होतो. मधुमेहाच्या रुग्णाने नारळाचे पाणी प्यावे की नाही, अशी शंका तुमच्या मनातही असेल तर आज आपण त्याचे उत्तर जाणून घेऊया..(Coconut water is more beneficial for diabetes patients).

नारळाच्या पाण्यात शून्य कॅलरी असतात!

हिरव्या कच्च्या नारळातून निघणारे गोड पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे, ज्यामध्ये शून्य कॅलरी असतात. यासह, इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

नारळपाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते!

मधुमेहाच्या आजारात नारळाच्या पाण्याचा काय परिणाम होतो, याबद्दल कोणतेही विशिष्ट संशोधनम अद्याप झालेले नाही. परंतु प्राण्यांवर केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नारळाच्या पाण्यात आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटामिन सी इंसुलिनचे प्रमाण सुधारण्यास मदत करते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयोगी ठरते (Coconut water is more beneficial for diabetes patients).

हानिकारक नाही म्हणून जास्त पिऊ नये!

जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असेही नमूद केले आहे की, नारळ पाण्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. परंतु, याचवेळी हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे की, ते नैसर्गिकरित्या गोड आहे आणि फ्रुक्टोज आहे म्हणून, नारळाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह रूग्णांनी दररोज 1 कपपेक्षा (240 एमएल) जास्त नारळ पाण्याचे सेवन करू नये.

नारळाच्या पाण्याचे आणखी बरेच फायदे

– याचे सेवन करून आपण शरीराला हायड्रेटेड ठेवून, किडनी स्टोनचा आजार टाळू शकता आणि नारळपाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी एक चांगला स्त्रोत आहे.

– नारळपाण्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराईड्स कमी होऊन हृदयरोग होण्याचा धोकाही कमी होतो.

– नारळाच्या पाण्यात पर्याप्त प्रमाणात पोटॅशियम असते, त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासही मदत होते.

– अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध नारळपाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून इतर रोगांशी लढण्यासही मदत करतो.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Coconut water is more beneficial for diabetes patients)

हेही वाचा :

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

Fitness | जिममध्ये घाम गाळूनही ‘बॉडी’ बनत नाहीय? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें