थंडीच्या दिवसांत केसांसाठी नारळाच्या तेलाऐवजी ‘नारळ पाणी’ लाभदायी, वाचा याचे फायदे…

थंडीच्या दिवसांत केसांसाठी नारळाच्या तेलाऐवजी ‘नारळ पाणी’ लाभदायी, वाचा याचे फायदे...

नारळ पाण्यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट देखील असतात, जे आपल्या केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात.

Harshada Bhirvandekar

|

Jan 19, 2021 | 5:22 PM

मुंबई : नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच नारळ पाण्यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट देखील असतात, जे आपल्या केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. केसांसाठी नारळ तेलच नाही तर नारळ पाणी देखील लाभदायी आहे. हेअर मास्क म्हणून आपण नारळाचे पाणी देखील वापरू शकता. नारळाचे पाणी आपले खराब झालेले केस दुरुस्त करण्याचे काम करते (Hair Care tips with Coconut water).

हिवाळ्याच्या दिवसांत नारळ तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. परंतु, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नारळ तेलापेक्षा नारळपाणी जास्त फायदेशीर आहे. केसांना नारळ तेल लावण्याची प्रक्रिया सगळ्यांनाच माहित आहे. चला तर, केसांवर नारळ पाणी कसे वापरावे ते जाणून घेऊया…

नारळ पाणी केसांवर लावण्याची प्रक्रिया :

एका भांड्यात नारळाचे पाणी काढून घ्या. सुमारे 4 ते 5 चमचे नारळ पाण्यात एक चमचा गुलाब पाणी घाला. नंतर हे मिश्रण कापसाच्या बोळ्यामध्ये घ्या आणि तेलाप्रमाणेच केसांच्या मुळांवर लावा. हे हेअर मास्क केसांवर लावण्यासाठी हलका आहे आणि केसामध्ये सहजपणे शोषला देखील जातो. किमान एक तासानंतर शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून घ्या. आपण इच्छित असल्यास, हे मिश्रण केसांमध्ये रात्रभर ठेवू शकता आणि सकाळी केस धुवू शकता (Hair Care tips with Coconut water).

केस गळतीची समस्या

जर, आपल्याला केस गळतीची समस्या असेल, तर आपण नारळ पाणी वापरू शकता. यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहते. नारळाचे पाणी लावल्याने केस गळणे कमी होतात. याशिवाय केसांना फाटे फूटण्याची समस्याही दूर होते. नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे आपल्या केसांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करते. यामुळे आपल्याला केसांची ताकद वाढते.

केसांतील कोंड्याची समस्या

नारळाच्या पाण्यात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे केसांत अनेक प्रकारचे पोषक घटक तयार होत असतात. ही पाणी आपल्या स्काल्पला मॉइश्चराइझ करण्याचे काम करते आणि केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते.

चमकदार केस

आठवड्यातून किमान दोन दिवस नारळाच्या पाण्याचे मिश्रण लावून केसांना व्यवस्थित मसाज करा. या मसाजमुळे केस पूर्वीपेक्षा मजबूत आणि दाट होतील. याशिवाय ते मुळांना हायड्रेट देखील ठेवते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair Care tips with Coconut water)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें