Hair Style | हिवाळ्याच्या दिवसांत ‘या’ हटके हेअर स्टाईल देतील ट्रेंडी लूक, केसांच्या समस्याही होतील कमी!

आज आम्ही तुम्हाला काही खास केशरचना सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा लुक स्टाईलिश आणि सुंदर दिसेल. तसेच, केस गळतीची समस्या कमी होतील.

Hair Style | हिवाळ्याच्या दिवसांत ‘या’ हटके हेअर स्टाईल देतील ट्रेंडी लूक, केसांच्या समस्याही होतील कमी!
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 11:26 AM

मुंबई : हिवाळ्यात, केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस बहुतेक वेळा तुटू लागतात. अशा स्थितीत केस खुले ठेवले तर, केस गळती वाढते. ज्यामुळे केस पातळ होऊ लागतात. तर, ही समस्या टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास केशरचना सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा लुक स्टाईलिश आणि सुंदर दिसेल. तसेच, केस गळतीची समस्या कमी होतील (Winter Special Trendy stylish Hair Styles to prevent hairfall).

साईड पोनी

केशरचनेची सर्वात सोपी शैली साईड पोनी आहे. जेव्हा आपल्याला ऑफिस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची घाई असेल, तेव्हा आपण पटकन साईड पोनी बांधू शकता. ही हेअर स्टाईल तयार करताना स्टाईलिश लुकसाठी, आपण आपल्या केसांच्या वरच्या बाजूस वेणी बांधू शकता किंवा अगदी सोपी सरळ पोनी बनवू शकता.

फिशटेल ब्रेड (वेणी)

फिशटेल ब्रेड ही हेअर स्टाईल खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. खासकरून जर, आपण कुर्ती लेगिंग्ज किंवा सलवार सूट परिधान केला असेल तर ही हेअर स्टाईल आपला लूक अधिक उठावदार बनवते. परंतु, ही हेअर स्टाईल थोडी अवघड आहे. तसेच, ही हेअर स्टाईल करण्यासाठी थोडा जास्त कालावधी देखील लागतो. इंटरनेटवर व्हिडीओ पाहून आपण ही हेअर स्टाईल अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकता (Winter Special Trendy stylish Hair Styles to prevent hairfall).

हाय पोनीटेल

हाय पोनीटेल ही हेअर स्टाईल सहसा सगळ्याच मुलींची आवडती केशरचना असते. विशेषत: जर तुमचे केस स्मूथ आणि सरळ असतील तर ही हेअर स्टाईल तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. यासाठी तुम्हाला आपले केस एकत्र घेऊन साधा उंच पोनी बनवावा लागेल. जर आपले केस हलके आणि पातळ असतील तर मग, पोनी बांधताना एकदा कंगवा उलटा फिरवा. यामुळे केसांमध्ये व्हॉल्युम तयार होईल.

नॉट अपडू हेयर स्टाईल

आपण घाईत असाल परंतु हेअर स्टाईलशी तडजोड करू इच्छित नसाल, घाईतही आपल्याला हटके हेअर स्टाईल बनवायची असेल, तर नॉट अपडू हेयर स्टाईल आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यासाठी, आपल्याला आपले सगळे केस एकत्र करावे लागतील आणि ते मानेच्या खालच्या बाजूला नेऊन केस दोन भागांमध्ये विभाजित करावे लागतील. बुटांच्या लेस बांधल्याप्रमाणे केसांची एक गाठ बांधावी लागेल. ही हेअर स्टाईल बराच  काळासाठी टिकवण्यासाठी, आपण काही हेअर पिन किंवा हेअर स्प्रे देखील वापरू शकता.

(Winter Special Trendy stylish Hair Styles to prevent hairfall)

हेही वाचा :

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….