AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही, या 4 घरगुती उपायांनी Upper Lips Hair पासून मिळवा मुक्ती

अपर लिप्स वरील केस काढण्यासाठी अधिकतर महिला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करतात. खरेतर ज्या पद्धतीने कोविड रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत ते पाहून अनेक महिला पार्लरमध्ये जाण्यास घाबरत आहेत. मग अशा वेळी काय करावे? जेणेकरून घरच्या घरी ओठांवरील केस आपल्याला काढता येऊ शकतील यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय घेऊन आलो आहोत.

आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही, या 4 घरगुती उपायांनी Upper Lips Hair पासून मिळवा मुक्ती
Upper lips hair
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 4:41 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंतेमध्ये भर टाकणारी आहे. अशातच सगळीकडे सरकार कडक निर्बंध लावत आहे. दुसरीकडे डॉक्टर्स आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे सल्ले सुद्धा देत आहे. पुन्हा एकदा आपल्याला आपल्या कार्यपद्धतीवर लक्ष द्यायचे आहे आणि आपल्या ज्या काही दैनंदिन जीवनातील क्रिया आहेत त्यांच्यामध्ये बदल करणे आपल्याला गरजेचे आहे. या दैनंदिन जीवनामध्ये पार्लर सुद्धा एक गरज म्हणून आपल्याला पाहायला मिळते. महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून पार्लरकडे पाहिले जाते, परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता अनेक महिला घरच्या घरीच पार्लर करत आहेत. आणि अनेक ब्युटी केअरच्या वेगवेगळ्या टिप्स पद्धती स्वतः आपल्या शरीरावर ट्रायसुद्धा करत आहेत. परंतु अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला पार्लरची आवश्यकता भासतेच. त्यातील एक म्हणजे अप्पर लिप्स (Upper Lips Hair Removal) वरील केस काढणे.

साधारणतः मुली थ्रेडिंग च्या माध्यमातून ओठांवर वाढलेले केस काढून टाकतात. तुम्ही सुद्धा थ्रेडिंगच्या माध्यमातूनच अप्पर लिप्स वरील केस काढत असाल आणि या सगळ्या पद्धतीमुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यास अजिबात वेळ नाही आणि जर तुमची इच्छा असेल की या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरच्या घरी करता याव्यात तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही घरच्या घरी अप्पर लिप्स वरील केस सहजरीत्या काढू शकता.

रेजरचा वापर करा

जर आपण रेजर चालवला तर मोठे आणि काळे केस येऊ लागतात असा सर्वात मोठा गैरसमज आहे. वर्ष 2007 मध्ये NCBI मध्ये पब्लिश झालेले ‘मेडिकल मिथ्स’ या नावाने एक अभ्यास करण्यात आला होता आणि या अभ्यासांतर्गत असे निष्कर्ष सिद्ध झाले की, शेविंग केल्यानंतर केसांच्या वाढीमध्ये किंवा त्यांच्या आकारांमध्ये कोणत्याच प्रकारचा फरक जाणवत नाही व तो दिसून सुद्धा येत नाही. जर तुम्हाला शेविंग रेजर (shaving razor) चा वापर करायचा असेल तर अशावेळी तुम्ही फेशियल रेजर्स सुद्धा वापर करू शकता. हा फेशियल रेजर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता आणि बाजारामध्ये सुद्धा हे रेजर सहजरित्या उपलब्ध होते.

वॅक्स स्ट्रिप

बाजारात फेस वॅक्सिंगसाठी वेगळ्या प्रकारच्या स्ट्रिप्स मिळतात. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही या स्ट्रिप्स ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. यांना फक्त आपल्याला चेहऱ्यावर लावायचे असते आणि ज्या पद्धतीने आपण Wax strips खेचत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या strips सुद्धा खेचायचे असतात असे केल्याने तुम्हाला लगेच अप्पर लिप्स वरील जे काही केस आहेत त्या केसां पासून सुटका प्राप्त करून देईल. जर असे केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आग होत असेल तर अशा वेळी तुम्ही जळन दूर करण्यासाठी बर्फ लावू शकता जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे दाणे येऊ नये.

शुगरिंग

शुगरिंग ही पद्धत मेथड हॉट वॅक्स सारखीच काम करते, तुम्ही हे घरच्या घरी सुद्धा बनवू शकता, यासाठी तुम्हाला मध, साखर, लिंबाचा रस आणि पाणी हे पदार्थ लागतील. आता आपल्याला हे पदार्थ व्यवस्थित एकजीव करुन गरम करायचे आहेत आणि हे मिश्रण विरघळल्यानंतर गॅस बंद करून थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या ओठांच्या वरील भागावर हे मिश्रण लावायचे आहे त्यानंतर आपल्याला या प्रभावी जागेवर एक कपडा लावायचा आहे आणि wax strips प्रमाणे खेचायचे आहे.

ही सारी प्रक्रिया तुम्हाला खूपच सावधानता बाळगून करायची आहे अन्यथा तुमच्या स्कीनवर वेगवेगळ्या प्रकारचे इरीटेशन किंवा जळजळसुद्धा होऊ शकते जर तुम्ही पहिल्यांदा ही प्रक्रिया करत असाल तर अशावेळी तुमच्या हातावर आधी ही प्रक्रिया करून पहा. जर तुम्हाला शक्य झाले, सहन झाले तर तुमच्या चेहऱ्यावर शुगरीन करा अन्यथा तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ट्विजिंग

ट्विजर्स ला अनेक लोक प्लकर सुद्धा म्हणतात. प्लकर बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते, याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या ओठावरचे केस सहजरीत्या खेचून काढू शकतात. ही प्रक्रिया थोडी वेदना देणारी आहे परंतु यामुळे तुमच्या ओठावरील केस मुळापासून निघून जाण्यास मदत होईल, असे केल्याने जर तुमच्या ओठांवरील भाग जर लाल झाला असेल तर अशावेळी त्वरित त्या प्रभावित जागेवर बर्फ लावावा किंवा थंडगार कोरफडीचे जेल लावावे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल कोणत्याही प्रकारची सेन्सिटिव्हिटी तुमच्या स्किनवर असेल तर अशा वेळी कोणत्याही केमिकल प्रॉडक्ट पासून तुमची त्वचा लांबच ठेवा.

इतर बातम्या

त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

चकाचक चेहरा हवा आहे? मग ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!

कोरड्या केसांची आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा, वाचा फायदे!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.