Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी स्ट्रॉबेरीचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

स्ट्रॉबेरी केवळ आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नसते तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. स्ट्रॉबेरी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.

Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी स्ट्रॉबेरीचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक

मुंबई : स्ट्रॉबेरी केवळ आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नसते तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. स्ट्रॉबेरी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्वचे संदर्भातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण स्ट्रॉबेरीचा वापर करू शकतो. विशेष म्हणजे घरच्या घरी स्ट्रॉबेरीचे विविध फेसपॅक तयार करू शकतो. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. (Strawberry face pack beneficial for glowing skin)

स्ट्रॉबेरी आणि लिंबू फेसपॅक

त्वचेवरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि लिंबू फेसपॅक वापरू शकता. हे आपल्या त्वचेला डी-टॅन करण्यात मदत करेल. यासाठी, आपल्याला स्ट्रॉबेरी प्यूरीमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट मास्क

स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट मास्क घरी तयार करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉबेरी प्युरी, एक चमचा कोको पावडर आणि मध आवश्यक असेल. या सर्व घटकांना मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. हे आपल्या त्वचेला चमकदार बनविण्यात मदत करेल. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल.

स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम फेसपॅक

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण स्ट्रॉबेरी प्युरी आणि फ्रेश क्रीम फेसपॅक बनवू शकता. तेलकट त्वचेसाठी आपण दही आणि स्ट्रॉबेरी प्युरीसह फेस मास्क बनवू शकता. हे सर्व चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आपण हा मास्क फ्रीजमध्ये ठेवू शकता. आपण याचा नियमित वापर करू शकता. मुरुमांची समस्या कमी करण्यास हा मास्क मदत करतो.

कसा बनवायचा एक्सफोलीएटिंग फेस मास्क

– पेस्ट बनवण्यासाठी सर्व साहित्य एका भांड्यात मिसळा. त्यात गुठळ्या नसल्याचे सुनिश्चित करा.
– आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल पंचर करा आणि मिक्सरमध्ये तेल पिळून घ्या.
– पॅकला हलवून घ्या आणि आपल्या त्वचेच्या एकसमान थरात लावा.
– पॅक लावल्यानंतर 8 ते 10 मिनिटे थांबा.
– पॅक सुकल्यावर हळूवारपणे मालिश करण्यासाठी हात ओले करुन घ्या. हे त्वचेला एक्सफोलिएट करणे आणि त्वचेला मृत पेशींपासून मुक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
– थंड पाण्याने चेहरा धुवा आणि आपल्या त्वचेला चांगले मॉईश्चराईज द्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

(Strawberry face pack beneficial for glowing skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI