Hair | पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय नक्कीच करा!

| Updated on: May 18, 2022 | 2:46 PM

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि आवळा पावडरपासून बनवलेला हेअर मास्क वापरू शकता. यासाठी 1 कप आवळा पावडर लागेल. ही पावडर तुम्ही बाजारातूनही सहज खरेदी करू शकता. प्रथम ही पावडर लोखंडी कढईत ठेवा. आता त्यात तेल घाला. ते 20 मिनिटे चांगले उकळवा, दिवसभर असेच राहू द्या.

Hair | पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय नक्कीच करा!
लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश
Image Credit source: stock.adobe.com
Follow us on

मुंबई : खराब जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या केसांवर आणि त्वचेवर परिणाम होतो आहे. त्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते. आजकाल अगदी कमी वयामध्ये केस पांढरे (White Hair) होण्याची समस्या वाढली आहे. अशा परिस्थितीत पांढर्‍या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोकांना अनेक महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे आपल्या केसांचे दीर्घकाळ खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय (Home Remedies) देखील करून पाहू शकता. ज्यामुळे कमी खर्चामध्ये देखील पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता

केस पांढरे होण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. मात्र, पांढरे केसांची समस्या दूर करण्यासाठी आपण खोबरेल तेल आणि कढीपत्त्याचा हेअरमास्क वापरू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी 3 चमचे खोबरेल तेल गरम करा. त्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाका, 20 मिनिटे असेच राहू द्या. त्यामुळे कढीपत्त्यातील सर्व पोषक तत्वे खोबरेल तेलात मिसळतील. हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

खोबरेल तेल आणि आवळा

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि आवळा पावडरपासून बनवलेला हेअर मास्क वापरू शकता. यासाठी 1 कप आवळा पावडर लागेल. ही पावडर तुम्ही बाजारातूनही सहज खरेदी करू शकता. प्रथम ही पावडर लोखंडी कढईत ठेवा. आता त्यात तेल घाला. ते 20 मिनिटे चांगले उकळवा, दिवसभर असेच राहू द्या. यानंतर ते गाळून घ्या. या तेलाने केसांना आणि टाळूला मसाज करा. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

भृंगराज आणि मेथी

पांढऱ्या केसांची आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी भृंगराज आणि मेथी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी भृंगराज आणि मेथी पावडर घ्या आणि त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून हेअर पॅक तयार करा. हा पॅक केसांवर वीस मिनिटे ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल. डोक्यातील कोंडा आणि टाळूचा कोरडेपणा यावर उपचार करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. हे खराब झालेल्या आणि कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. भृंगराज ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्याचे तेल लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, पॉलीपेप्टाइड्स आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)