Skin Care Tips : ‘या’ 5 नैसर्गिक घरगुती उपायांनी चेहरा तजेलदार बनवा!

| Updated on: Sep 27, 2021 | 5:16 PM

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, प्रयत्न करूनही म्हणावी तशी त्वचा मिळत नाही. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल केले तरी आपल्याला सुंदर त्वचा मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे आपली त्वचा कायमस्वरूपी सुंदर आणि तजेलदार दिसते.

Skin Care Tips : या 5 नैसर्गिक घरगुती उपायांनी चेहरा तजेलदार बनवा!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, प्रयत्न करूनही म्हणावी तशी त्वचा मिळत नाही. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडे बदल केले तरी आपल्याला सुंदर त्वचा मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे आपली त्वचा कायमस्वरूपी सुंदर आणि तजेलदार दिसते. यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावे लागतील. (These 5 natural home remedies are beneficial for the skin)

अंडी

अंडी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण अंड्याचा फेस मास्क वापरू शकता. यासाठी एका अंड्यामध्ये एक चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. आपला चेहरा स्वच्छ करून घ्या. आता हा फेस मास्क लावा आणि 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेस मास्क दररोज लावल्याने मुरूमाची समस्या दूर होते.

कोरफड

कोरफड त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मऊ होते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेची जळजळ आणि जखमा दूर करते. हे पुरळ चट्टे आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करू शकते. हे कोलेजन आणि इलॅस्टिन फायबरचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. यासाठी दररोज दोनदा कोरफडीचा रस तुमच्या त्वचेवर लावा.

अॅपल व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. त्यात एसिटिक अॅसिड असते. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. बेसन, मध आणि अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. ही पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ते 15 मिनिटे सोडा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा पॅक आपण चेहऱ्याला लावाला पाहिजे.

हळद

हळद आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. ज्यात दाहक-विरोधी, सूक्ष्मजीवविरोधी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हळद आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हळद आणि दही मिसळून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

ग्रीन टी

ग्रीन टी हे हेल्दी ड्रिंक आहे. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्सची जास्त मात्रा आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यात प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ग्रीन टीचा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे ग्रीन टी, बेसन आणि दही मिक्स करा. हा पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 5 natural home remedies are beneficial for the skin)