AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : ग्लोइंग स्किनसाठी ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की वापरा!

आपण सौंदर्य वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Skin Care Tips : ग्लोइंग स्किनसाठी 'हे' घरगुती फेसपॅक नक्की वापरा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 4:36 PM
Share

मुंबई : चमकणारी आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी लोक महागड्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु त्यांचा प्रभाव त्वचेवर अगदी कमी काळासाठी दिसतो. अशा परिस्थितीत, आपण सौंदर्य वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. (This face pack is beneficial for glowing skin)

चंदन पावडर आणि मध

एका वाटीत एक चमचा चंदन पावडर घ्या. त्यात पुरेशा प्रमाणात मध घाला. चमकदार त्वचेसाठी हा आयुर्वेदिक फेसपॅक तयार करा. बोटांनी हलक्या हाताने मालिश करून संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा. 15 ते 20 मिनिटे सोडा. यानंतर थंड पाण्याने धुवा.

केशर आणि दह्याचा फेसपॅक

ताजे दही 1-2 चमचे घ्या आणि त्यात केशर 4-5 घाला. हे घटक एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी त्वचेची मालिश करा. 15-20 मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वापरू शकता.

संत्र्याच्या सालीची पावडर आणि कच्चे दूध

एक चमचा संत्र्याच्या सालीची पूड घ्या आणि त्यात थोडे कच्चे दूध घाला. सर्व चेहरा आणि मानेवर समान रीतीने लावा. गोलाकार हालचालींमध्ये हळूवारपणे आपल्या बोटाने त्वचेवर मालिश करा. 15 ते 20 मिनिटे सोडा. त्यानंतर तोंड पाण्याने धुवा. चमकदार त्वचेसाठी तुम्ही हा आयुर्वेदिक फेसपॅक आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा वापरू शकता.

चंदन पावडर आणि दही

एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेसपॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. अप्लाय केल्यानंतर, ते 15 मिनिटे पुरपणे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack is beneficial for glowing skin)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल