Beauty Tips : सणासुदीच्या काळात निरोगी त्वचा आणि केसांसाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा! 

| Updated on: Oct 26, 2021 | 8:04 AM

सणासुदीच्या काळात चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी आपण नैसर्गिक उपाय देखील वापरू शकता. आपण आयुर्वेदिक औषधी वनस्पतीच्या मदतीने केस आणि त्वचा सुंदर मिळू शकतो. घरगुती उपायांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. म्हणूनच आजकाल महिला या घरगुती उपचारांकडे वळत आहेत.

Beauty Tips : सणासुदीच्या काळात निरोगी त्वचा आणि केसांसाठी हे घरगुती उपाय करून पाहा! 
त्वचेची काळजी
Follow us on

मुंबई : सणासुदीच्या काळात चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी आपण नैसर्गिक उपाय देखील वापरू शकता. आपण आयुर्वेदिक औषधी वनस्पतीच्या मदतीने केस आणि त्वचा सुंदर मिळू शकतो. घरगुती उपायांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. म्हणूनच आजकाल महिला या घरगुती उपचारांकडे वळत आहेत. निरोगी त्वचा आणि केसांसाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता हे आपण पाहूयात.

कोरफड आणि भृंगराज हेअर पॅक

कोरफड त्वचेची आणि केसांची काळजी घेण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. हे जीवनसत्त्वे आणि अमीनो अॅसिड सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे आपले केस निरोगी बनविण्यात मदत करतात. संशोधनानुसार, कोरफडीच्या पानांमध्ये असलेले जेल केसांना मऊ करण्यास मदत करते. भृंगराज एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानली जातात. हे लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ई आणि डीचा समृद्ध स्रोत आहे.

भृंगराज आणि कोरफड हेअर पॅक कसा बनवायचा

भृंगराजचे 1 पान किंवा 1 चमचा भृंगराज पावडर घ्या. कोरफडीचे 1 पान घ्या. भृंगराजची पाने वापरत असाल तर धुवून बारीक करून पावडर बनवा. आता कोरफडीच्या पानाच्या दोन्ही बाजूचे काटे कापून धुवा आणि नंतर बारीक करा. यानंतर, कोरफडीच्या पानांमधून जेल बाहेर काढा. धुवा आणि बारीक करा. आता हे दोन्ही मिक्स करा. अशा प्रकारे तुमचा हेअर पॅक तयार होईल. हा हेअर पॅक आता संपूर्ण केसांना लावा. वीस मिनिटे हा पॅक आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

दही आणि हिबिस्कस फेसपॅक

दही त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्याबरोबरच त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. दहीमध्ये असलेले लैक्टिक अॅसिड त्वचेचा टोन एक्सफोलिएट करते. याशिवाय कोरडी त्वचा शांत करते. हिबिस्कस तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन सी देते. जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. व्हिटॅमिन सी त्वचेला चमक देण्यासाठी मदत करते. हे प्रदूषणाचे नुकसान टाळते, कोलेजन वाढवते आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळते.

दही आणि हिबिस्कस फेसपॅक कसा बनवायचा

हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे दही आणि 1 चमचे हिबिस्कस पावडर लागेल. एका वाडग्यात 2 चमचे दही आणि 1 चमचे हिबिस्कस पावडर घाला. तुम्ही बाजारातून पावडर विकत घेऊ शकता किंवा हिबिस्कसची फुले सुकवून घरीच पावडर बनवू शकता. पेस्ट तयार होईपर्यंत साहित्य मिसळा. आपला चेहरा धुवा आणि आपल्या त्वचेवर फेसपॅक लावा. हा फेसपॅक तुमच्या त्वचेवर सुमारे 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This home remedy is beneficial for healthy skin and hair during the festive season)