Skin Care Tips : कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

हिवाळ्यामध्ये सकाळी गरमा-गरम चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते. तसेच हिवाळ्याच्या हंगामात ताज्या आणि मस्त हिरव्यागार भाज्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात. मात्र, हिवाळ्यामध्ये कोरडेपणाची समस्या अधिक वाढते. यामुळे त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Skin Care Tips : कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी 'हे' घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 9:44 AM

मुंबई : हिवाळ्यामध्ये सकाळी गरमा-गरम चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते. तसेच हिवाळ्याच्या हंगामात ताज्या आणि मस्त हिरव्यागार भाज्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात. मात्र, हिवाळ्यामध्ये कोरडेपणाची समस्या अधिक वाढते. यामुळे त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या वाढते. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत.

मध

मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. मधामध्ये असलेले एन्झाईम त्वचेला मऊ करण्यास मदत करतात. बहुतेक सौंदर्य उत्पादनांमध्ये मध हा वापरला जाणारा मुख्य घटक आहे. त्यामुळे कोरडेपणावर उपचार करण्यासाठी ते थेट त्वचेवर वापरले जाऊ शकते. यासाठी एका भांड्यात मध टाका. त्यात कापसाचा गोळा बुडवा आणि चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

लिंबू आणि टोमॅटो

त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधील ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

कोरफड

कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड म्यूकोपॉलिसॅकेराइड्स तयार करते, जे त्वचेच्या आतील ओलावा बंद करण्यास मदत करते. कोरफडमध्ये असलेले हायड्रेटिंग गुणधर्म कोरड्या त्वचेसाठी एक चांगला उपाय आहे. जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर तुम्ही कोरफडीचा वापर थेट चेहऱ्यावर करू शकता. काही वेळाने ते धुवून टाका. जर आपण दररोज सकाळी त्वचेला कोरफड लावली तर त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. यामुळे दररोज आपल्या त्वचेला कोरफड लावली पाहिजे.

खोबरेल तेल

कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. खोबरेल तेल थेट चेहऱ्यावरही लावता येते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला खोबरेल तेल लावा आणि सकाळी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे हिवाळ्यात देखील आपला चेहरा तजेलदार राहतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(This home remedy is beneficial for taking care of dry skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.