उन्हाळ्यात त्वचेची काळजी ‘या’ पद्धतीने घ्या, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येईल

शितल मुंडे, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Mar 13, 2021 | 7:12 AM

हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे आता आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी 'या' पद्धतीने घ्या, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येईल
चमकदार त्वचा

मुंबई : हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे आता आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आपल्या त्वचेला हवामानाशी जुळवून घेण्याची संधी द्या. फोमिंग क्लीन्झर्सचा वापर करा. त्वचा कोरडी होऊ न देता त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. (Skin care tips for summer)

-उन्हाळ्यात आपण चेहऱ्याला क्रीम लावली तर आपला चेहरा तेलकट होतो. हे टाळण्यासाठी आपण लोशन आणि सीरम वापरू शकता. याशिवाय तुम्ही वॉटर बेस्ड जेल आणि मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्यासाठी गुलाबजल देखील वापरा

-त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वीच सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावी असे काही नाही वर्षभर जरी सनस्क्रीन वापरली तरी त्वचेसाठी चांगली असते.

-त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे.

-तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

-उन्हाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्या जास्त खा आणि दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे आपला चेहरा ग्लो करेल.

संबंधित बातम्या : 

Amla Benefits | रोग प्रतिकारशक्त आणि हाडे मजबूत करण्यासाठी लाभदायी ‘आवळा’, अशाप्रकारे करा सेवन!

Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!

(Skin care tips for summer)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI