Skin Care Tips : चमकदार त्वचा हवी आहे? मग या 5 प्रकारे हळदीचा वापर करा!

| Updated on: Apr 20, 2022 | 12:46 PM

गेल्या अनेक वर्षांपासून हळदीचा (Turmeric) वापर साैंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. हळद आपल्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. हळदीशिवाय कोणत्याच खाद्यपदार्थाला चव लागत नाही. विशेष म्हणजे हळदीचा आहारामध्ये (Food) समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दररोज रात्री हळदीच्या दुधाचे सेवन केले तर आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत.

Skin Care Tips : चमकदार त्वचा हवी आहे? मग या 5 प्रकारे हळदीचा वापर करा!
हळद त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून हळदीचा (Turmeric) वापर साैंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. हळद आपल्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. हळदीशिवाय कोणत्याच खाद्यपदार्थाला चव लागत नाही. विशेष म्हणजे हळदीचा आहारामध्ये (Food) समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दररोज रात्री हळदीच्या दुधाचे सेवन केले तर आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर (Beneficial) आहे. हे मुरुम, काळे डाग, सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही हळदीमध्ये लिंबू, मध आणि टोमॅटो सारखे नैसर्गिक घटक मिसळून फेसपॅक बनवू शकता.

जाणून घ्या हळदीच्या फेसपॅक बद्दल-

  1. हळद आणि मध फेसपॅक- एक चमचा मध घ्या. त्यात चिमूटभर हळद घालून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा वापर करू शकता, यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
  2. हळद आणि केळीचा फेसपॅक- केळी आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. अर्धवट पिकलेली केळी घ्या आणि मॅश करा. त्यात चिमूटभर हलकी पावडर टाका आणि चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर त्वचेला पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
  3. हळद आणि लिंबू- 2 चमचे लिंबाचा रस घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर त्वचेला पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
  4. हळद आणि दही- 1 ते 2 चमचे दह्यात चिमूटभर हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. यामुळे आपल्या त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

Skin | घामामुळे त्वचेची चमक नाहीशी झाली आहे? मग हे खास फेसपॅक त्वचेला लावा आणि रिझल्ट पाहा!

Health | उन्हाळ्यात ही 4 खास पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर अनेक आजारही दूर राहण्यास मदत होईल!