Kanji Benefits: सोप्या पद्धतीनं घरच्या घरी बनवा कांजी; जाणून घ्या फायदे…

Kanji Recipe: निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये कांजीचा समावेश करावे. कांजी प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कांजीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यासोबतच तुमच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कांजी पिण्याचे जबरदस्त फायदे..

Kanji Benefits: सोप्या पद्धतीनं घरच्या घरी बनवा कांजी; जाणून घ्या फायदे...
सोप्या पद्धतीनं घरच्या घरी बनवा कांजी
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 28, 2025 | 2:15 PM

व्यस्त जीवनशैली आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेकजण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. जंक फूड आणि तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची वाढ होते. अनेकजण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देताना पाहायला मिळतात. तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे तुम्ही निरोगी राहाता. आजकाल विविध प्रकारच्या आरोग्यदायी पदार्थांचे व्हिडिओ देखील सेशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कोणत्याही ऋतूमध्ये कांजी प्यायल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

बदलत्या ऋतूमध्ये अनेकदा संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते ज्यामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्या सारख्या होतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. कांजी प्यायल्यामुळे तुमच्या आकरोग्याला अनेक फायदे होतात. बीटरूट आणि गाजर मिक्स करून तुम्ही घरच्या घरी कांजी बनवू शकता.

कांजीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यास निरोगी राहाण्यास मदत होते. कांजी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत करते. कांजी प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि तुमच्या शरीरातील चयापचय मजबूत करण्यास मदत करते. त्यासोबतच कांजीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी कांजी सोप्या पद्धतीनं कशी बनवायची?

गाजर मुळा कांजी रेसिपी :

साहित्य :- 250 ग्राम काळे गाजर , 100 ग्राम मुळा 2 चमचे मोहरी पावडर, मीठ, तिखट आणि आवश्यकतेनुसार पाणी लागेल.

कृती :- कांजी बनवण्यसाठी सर्वप्रथम गाजर आणि मुळ्याचे लांब तुकडे करा. त्यानंतर, एक काचेचे भांडे घ्या आणि त्यात 1 लिटर पाणी भरा. पाण्यामध्ये मुळ्याचे आणि गाजराचे तुकडे घाला. सर्वात शेवटी त्यात मीठ, मोहरी पूड आणि तिखट घालून मिक्स करा. हे मिश्रण काचेच्या भांड्यात झाकून 3 ते 4 दिवस उन्हात ठेवावे आणि दररोज एकदा चमच्याने हलवावे. घरच्या घरी तुमची गाजर मुळा कांजी तयार.

गाजर मुळा बीटरूट कांजी :

साहित्य :- 2 मुळा, 2 गाजर, 1 बीटरूट, 3 लिटर पाणी, 3 चमचे मोहरी, मीठ, काळे मीठ, 1 चमचा हिंग आणि आवश्यकतेनुसार मीठ लागेल.

कृती :- सर्वप्रथम मुळा, गाजर आणि बीटरूट यांचे लांब तुकडे करून उकळत्या पाण्यात टाका आणि 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करा. यानंतर पाणी थंड होऊ द्या. आता लाल मिरची, मोहरी, हिंग आणि चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये घालून बारीक करा. यानंतर त्यात थोडे पाणी घालून बारीक करून घ्या. आता ही भाजी पाण्यात मिसळून काचेच्या बरणीत भरून २ ते ३ दिवस उन्हात ठेवा. सोप्या पद्धतीनं कांजी तयार आहे.