AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजीर खाण्याचे फायदे मोठे, जाणून घ्या अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?

अंजीर हे उन्हाळ्यात पोटासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर भिजवल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत की अंजीर भिजवून का खावे आणि उरलेले पाणी आपण पिऊ शकतो का?

अंजीर खाण्याचे फायदे मोठे, जाणून घ्या अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?
| Updated on: May 15, 2024 | 10:28 PM
Share

अंजीर हे सुपरफूड मानले जाते. तुम्ही फळ आणि ड्राय फ्रूट म्हणून अंजीर नक्कीच खाऊ शकता. पण वाळलेले अंजीर लवकर खराब होत नाहीत. अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अंजीर हे नेहमीच पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता दूर होते आणि पोटासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते. तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही भिजवलेले अंजीर नक्की खालले पाहिजे. 1-2 अंजीर दररोज पाण्यात भिजवून सकाळी खावेत. मात्र, अंजीर भिजवलेले पाणी प्यावे की फेकून द्यावे हे काही लोकांना माहित नाही.

भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे?

  • भिजवलेले अंजीर खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पोट साफ होते.
  • फायबरमध्ये भरपूर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने अंजीर रक्तातील साखर नियंत्रित करते.
  • मधुमेह कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर खावे.
  • दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  • पीएमएस आणि पीसीओडी रुग्णांसाठीही अंजीर खूप फायदेशीर ठरते.
  • गर्भवती मातांसाठीही अंजीर फायदेशीर मानले जाते.
  • अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

आपण अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?

तुम्ही 2-3 अंजीर घेऊन ते ते रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजवावे. रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी प्रथम ते अंजीर खावून घ्या. यानंतर अंजीर भिजवलेले पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल.

अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. अंजीर हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. अंजीर खाल्ल्याने शरीराला कॅरोटीन, ल्युटीन, टॅनिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड मिळते. अंजीराचे सेवन फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. मधुमेही रुग्णही अंजीर खाऊ शकतात. जर तुम्ही फळ म्हणून ताजे अंजीर खाल्ले तर ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पॅन्टोथेनिक ॲसिड, पायरीडॉक्सिन, नियासिन आणि फोलेट्स पुरवतात.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.