
वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम हे सर्व करत असतात. पण जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर आहारात योग्य फळांचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा देते आणि साखरेची ओढ कमी करते. यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. विशेष म्हणजे फळांमुळे शरीरातील जास्तीची चरबी जाळण्यास मदत करतात. डाएट करताना फळांचा रस पिण्यापेक्षा ती चावून खाल्ल्यास शरीराला जास्त पोषण मिळते. त्यामुळे औषधे किंवा सप्लीमेंट्स घेण्यापेक्षा नैसर्गिक फळांच्या मदतीने वजन घटवणे हा कधीही उत्तम पर्याय आहे.
१. सफरचंद
सफरचंद हे डाएट करणाऱ्यांचे सर्वात आवडते फळ आहे. यामध्ये तंतूमय पदार्थ (Fiber) भरपूर असतात. एका मध्यम आकाराच्या सफरचंदात साधारणपणे ९५ कॅलरीज असतात. यातील पेक्टिन फायबरमुळे मेंदूला पोट भरल्याचे संकेत लवकर मिळतात, ज्यामुळे तुम्ही अती खाणे टाळता.
२. पपई
पपईमध्ये पपेन नावाचे पाचक एन्झाईम असते, जे प्रथिने (Proteins) पचवण्यास मदत करते. पपई खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म (Metabolism) सुधारते आणि पोटाचा घेर कमी करण्यास मदत होते. हे फळ पोटाच्या तक्रारी आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे.
३. पेरू
पेरू हा फायबरचा राजा मानला जातो. एका पेरूमध्ये तुमच्या दैनंदिन गरजेच्या १२ टक्के फायबर असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींसाठी आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी हे अत्यंत सुरक्षित फळ आहे. पेरू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते पण साखरेचे प्रमाण वाढत नाही.
४. स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी
बेरीजमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. त्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. सकाळी ओट्स किंवा दह्यासोबत बेरीज खाणे हा एक उत्तम ब्रेकफास्ट ठरू शकतो.
५. अननस
अननसामध्ये ‘ब्रोमेलेन’ नावाचे घटक असते, जे शरीरातील सूज कमी करण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करते. हे फळ व्यायामानंतर खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.