AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का?

शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता हाडे आणि सांधेदुखीला कारणीभूत ठरते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. पण बऱ्याच जणांना उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहिती नसते तसेच शरीराचा कोणाता भाग सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो तेही जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल.

शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का?
Get Vitamin D from SunlightImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 16, 2025 | 3:47 PM
Share

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता धोकादायक मानली जाते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधेदुखीची समस्या वाढते. एवढंच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. ज्यामुळे शरीरावर कोणते आजार होतात. अशा परिस्थितीत डॉक्टर व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी दररोज सकाळी सूर्यप्रकाश म्हणजे कोवळे ऊन घेण्याचा सल्ला दिला जातो.

शरीराचा कोणता भाग सूर्यापासून सर्वात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो?

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. अशा परिस्थितीत दररोज सूर्यप्रकाश घेणे खूप महत्वाचे आहे. तथापि, व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश कसा घ्यावा आणि कोणत्या वेळी आणि किती वेळ सूर्यप्रकाश घ्यावा हे फार कमी लोकांना माहिती आहे. चला जाणून घेऊया की शरीराचा कोणता भाग सूर्यापासून सर्वात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो?

उन्हात बसण्याची योग्य पद्धत

काही लोक सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी बराच वेळ आणि चुकीच्या पद्धतीने उन्हात बसतात. यामुळे टॅनिंग होऊ शकते किंवा तुम्हाला हवा तितका फायदा मिळत नाही. कारण लोकांना वाटते की सूर्याकडे तोंड करून बसल्याने व्हिटॅमिन डी मिळतं. पण तसं नाहीये ,डॉक्टर म्हणतात की डोळ्यांमधून व्हिटॅमिन डी मिळत नाही. उलट, जेव्हा सूर्याची किरणे तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा आपले शरीर स्वतःच व्हिटॅमिन डी तयार करते.

सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी कसे मिळवायचे?

जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात बसता तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. डॉक्टर जमाल खान यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत स्पष्ट केली आहे. डॉक्टर म्हणतात की व्हिटॅमिन डी फक्त सूर्यप्रकाश पाहून किंवा डोळ्यांनी मिळत नाही. उलट, आपली त्वचा जितकी जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येईल तितके जास्त व्हिटॅमिन डी आपल्याला मिळेल. विशेषतः कंबर, होय कंबर सर्वात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाश घेण्यासाठी उन्हात थांबाल तेव्हा सूर्यप्रकाश कंबरेवर पडला पाहिजे. कंबर उघडी असेल तर खूप चांगलं आहे, अन्यथा शरीराला हलक्या मलमलच्या कापडाने झाका. जेणेकरून सूर्यप्रकाश कंबरेवर पडू शकेल.

सकाळी सूर्यप्रकाश घेतल्यानंतर व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

जेव्हा सूर्याची किरणे शरीरावर पडतात तेव्हा आत होणाऱ्या पोषणाच्या विघटनामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. अशाप्रकारे, सकाळी फक्त 15 मिनिटे उन्हात बसून, व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळू शकते. व्हिटॅमिन डीसाठी, उन्हाळ्यात सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि हिवाळ्यात सकाळी 9 वाजण्यापूर्वी सूर्यप्रकाश घ्या. यामुळे शरीराला दररोज आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी सहज मिळू शकते.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी