Travel | निसर्गसौंदर्याचा विलक्षण देखावा, मुंबईजवळच्या ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Dec 21, 2020 | 12:33 PM

आपल्याला शहराच्या बाहेर एखाद्या साहसी ट्रेकवर जायचे असेल, किंवा निर्सगाच्या सहवासात काही काळ शांतपणे घालवायचा असेल तर, मुंबईजवळील ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे.

Travel | निसर्गसौंदर्याचा विलक्षण देखावा, मुंबईजवळच्या ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
Follow us on

मुंबई : मुंबईतील धकाधक आणि धावपळीमुळे आपल्याला नेहमीच शहरात सुट्ट्यांचा आनंद घेण्यापेक्षा, घरापासून-मुंबईपासून दूर कुठेतरी निवांत जागी विकेंड साजरा करण्याची इच्छा होत असते. अशावेळी, आपल्याला शहराच्या बाहेर एखाद्या साहसी ट्रेकवर जायचे असेल, किंवा निर्सगाच्या सहवासात काही काळ शांतपणे घालवायचा असेल तर, मुंबईजवळील ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे (Best Weekend travel destination near Mumbai).

एक दिवस वाईन व सूर्यप्रकाशाचा सहवास अनुभवण्यासाठी सुला वाईनयार्ड्स

मुंबईपासून सुमारे 230 किमी अंतरावरच्या या द्राक्षांच्या मळ्यांमध्ये आपण झोकात निवांतपणा अनुभवू शकता. संपूर्ण वाईनयार्ड व वायनरीच्या सहलीसोबत ग्रेप-टू-ग्लासचा अनुभव घ्यायचा असेल किंवा सुला बियाँड या विलक्षण इन-हाऊस व्हिलामध्ये राहता येतं. सुला वाईनयार्ड एक दिवसाच्या सहलीसाठी किंवा तेथे थांबून विकेंड साजरा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथे चविष्ट जेवणासोबत, स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहण्याचा आणि गावातल्या रस्त्यांवर सायकलने फेरफटका मारण्याचा आनंद घेऊ शकता.

जलक्रीडा अनुभवण्यासाठी कोलाड

महाराष्ट्रातील साहसी क्रीडाप्रकारांचे केंद्रस्थान असलेले रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण त्याच्या कुंडलिका नदीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पुढ्यात वसलेले व मुंबईपासून 121 किमी अंतरावरील कोलाड हे नेहमीच साहसी क्रीडाप्रकारांनी गजबजलेले असते. रिव्हर राफ्टिंगशिवाय येथे कॅनोइंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग आणि रिव्हर झिप लाईन क्रॉसिंगचे हे साहसी खेळी उपलब्ध आहेत (Best Weekend travel destination near Mumbai).

डोंगर माथ्यावरच्या सुर्यास्ताचा आस्वाद घेण्यासाठी माथेरान

मुंबईपासून फक्त 90 किमी अंतरावर असलेले हे हिल स्टेशन पश्चिम घाटांमध्ये समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे वाहनांना ज्याण्याची परवानगी नाही. येथे वृक्षाच्छादित भागांमधून आपण पायीच लांब फेरफटका मारू शकता. घोडेस्वारीदेखील करून शकता. लुईसा व हनीमून पॉईंटदरम्यान झीप-लायनिंगचा आनंद घेऊ शकता.

निसर्गाचा आस्वाद व इतिहासाच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी माथेरान

पिकनिकसाठी आलेल्या पर्यटकांना पक्षी निरीक्षण, नैसर्गिक पाऊलवाटांवरून ट्रेकिंग आणि कर्नाळा किल्ल्याला भेट देण्याची संधी इथे मिळते. पनवेलपासून 12 किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य 12.11 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. हे एक विलक्षण दुर्मिळ ठिकाण आहे, जेथे निवासी पक्ष्यांच्या 150 प्रजातींचे व स्थलांतरित पक्ष्यांच्या 37 प्रजातींचे निवासस्थान आहे. कर्नाळा किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादवांनी केली होती व नंतर त्याला तुघलकाने काबीज केले होते. कर्नाळा चढण्यासाठी आपल्याला किमान एक तासाचा अवधी लागतो. मात्र, वर पोहोचल्यानंतर येथून मुंबई बंदराचे विहंगम दृश्य आपले मन मोहवून टाकते.

(Best Weekend travel destination near Mumbai)

हेही वाचा :