Cleanest Beach | स्वच्छ निळ्याशार पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ इच्छिता? भारतातील ‘या’ समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!

बर्‍याच लोकांना आपली सुट्टी स्वच्छ, निळ्याशार आणि सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांवर घालवायची असते

1/6
सुट्टीचा हंगाम सुरू झाला आहे. बर्‍याच लोकांना आपली सुट्टी स्वच्छ, निळ्याशार आणि सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांवर घालवायची असते. तुम्हालाही जर भारतातील समुद्र किनाऱ्यांवर फिरायचे असेल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही समुद्रकिनाऱ्यांविषयी माहिती देत आहोत, जे त्यांच्या स्वच्छतेसाठी परिचित आहेत.

2/6
अगोंदा बीच - अगोंदा हे दक्षिण गोव्यातील समुद्र किनारी वसलेले एक छोटेसे गाव आहे. हा किनारा भारतातील सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ किनार्‍यांपैकी एक आहे. येथे रंगीबेरंगी बीच शेक्स, शाकाहारी रेस्टॉरंट्स आणि बुटीक रिसॉर्ट्स आहेत. बरेच लोक येथे समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येतात.

3/6
अलेप्पी बीच - केरळमधील अलेप्पी समुद्र किनारा शतको जुना आहे. इथले सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे समुद्रकाठचे पाम वृक्ष. सूर्यास्ताच्या वेळी या किनाऱ्याचे सौंदर्य आणखी वाढवते.

4/6
पदुबिद्री बीच- पदुबिद्री हे कर्नाटकातील उडुपीपासून 24 कि.मी. अंतरावर वसलेले एक लहान शहर आहे. पदुबिद्री बीच हा राज्यातील दोन प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. ज्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.

5/6
पालोलेम बीच - गोव्यामधील पालोलेम बीच आपल्या स्वच्छ किनाऱ्यासाठी आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. येथील सायलेंट डिस्को खूप लोकप्रिय आहे. मजेची गोष्ट अशी आहे की, लोकांमध्ये शांतता राखण्यासाठी हेडफोन्स घालून पार्टीकेली जाते. पर्यटकांना समुद्र समुद्रकिनाऱ्यावर रहाण्यासाठी येथे रंगीबेरंगी घरे बांधली गेली आहेत, जी खूप सुंदर दिसतात.

6/6
राधानगर बीच - अंदमान बेटावरील राधानगर बीच हा जगातील सर्वोत्तम समुद्र किनार मानला जातो. पांढऱ्या वाळूवर समोर नितळ निळेशार पाणी आणि दुसर्‍या बाजूला असलेल्या जंगलाचे सुंदर दृश्य पाहण्यात आपण आपला संपूर्ण दिवस घालवू शकता. दरम्यान, लाटांची उंचीही कमी असल्याने लोक पोहण्याचा मनमुराद आनंद लुटतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI