दुधी भोपळा आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठी देखील फायदेशीर

| Updated on: Mar 30, 2021 | 8:43 AM

दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे.

दुधी भोपळा आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठी देखील फायदेशीर
Follow us on

मुंबई : दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. अन्नाव्यतिरिक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. (Calabash is beneficial for health and skin)

वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही केला जातो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दुधी भोपळा आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. दुधी भोपळ्याच्या सालीचा लेप आपल्या त्वचेसीठी खूप चांगला असतो. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि चांगली होते. किंवा हाच दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या तळव्यावर चोळला तर पायांची उष्णता आणि त्यामुळे निर्माण होणारी जळजळ लगेचच थांबते.

-दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची 7-8 पाने, पुदिन्याची 7-8 पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा.

-स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.

-दुधी भोपळ्याचे अनेक फायदे आहेत. मूळव्याधाच्या आजारावरदेखील दुधी उपयोगी पडतो. त्यासाठी दुधी भोपळ्याचे साल सुकवून त्याचा बारीक भुगा बनवून घ्या. आणि रोज सकाळी-सायंकाळी एक चमचा थंड पाण्यासोबत याचं सेवन करा. त्यामुळेदेखील तुम्हाला आराम मिळेल.

-याशिवाय दुधी भोपळा पोटाच्या विकारांकरताही खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याला मंद आचेवर भाजून त्याचा भरीत बनवा. त्यातील रस पिळून काढून त्यामध्ये थोडी साखर घालून प्यायल्यामुळे लिव्हर आणि पोटाच्या विकारांवर फायदा होता. गरम पाण्यात उकळून घेतलेल्या भोपळ्याचा रायता खाल्ल्यानं अतिसारावरदेखील आराम मिळतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Calabash is beneficial for health and skin)