शारीरात कॅल्शियमची कमतरता, पण दूध प्यायला येतो कंटळा, मग आजपासून ‘हे’ पदार्थ खा
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. कायम कामाच्या मागे धावत असतो. अशात शारीरात कॅल्शियमची कमतरता भासते. पण अनेकांना दूध आवडत अशात, 'हे' पदार्थ आरोग्यास लाभदायक ठरतील.

कॅल्शियम शारीरासाठी फार गरजेचे आहे… शरीरात कॅल्शियम योग्य प्रमाणात असल्यामुळे आरोग्या चांगले राहते. हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध पिणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण ज्यांना दूध आवडत नाही त्यांचे काय? असे इतर पदार्थ आहेत जे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात? शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारात समाविष्ट केले पाहिजे अशा काही पदार्थांवर एक नजर टाकूया…
यादीत सर्वात आधी चिया बिया आहेत. चिया बिया पोषक तत्वांचा खजिना आहेत. त्या कॅल्शियमनेही समृद्ध आहेत. फक्त दोन चमचे चिया बियांमध्ये सुमारे 179 मिलीग्रॅम कॅल्शियम असते असे म्हटले जाते. हे एका ग्लास दुधापेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, ओमेगा-3 फॅटी ॲसिड मिळवण्यासाठी देखील आहारात चिया बियांचा समावेश केला जाऊ शकतो.
तिळामध्ये कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते. 100 ग्रॅम तिळामध्ये सुमारे 975 मिग्रॅ कॅल्शियम असते. हे प्रमाण एका ग्लास दुधातील कॅल्शियमपेक्षाही जास्त आहे.
कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारात पालकाच्या पदार्थांचाही समावेश करता येतो. असे म्हटले जाते की एक कप शिजवलेल्या पालकाच्या पानांमध्ये सुमारे 275मिग्रॅ कॅल्शियम असते. त्यामुळे, पालक हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी चांगला असतो.
नाचणी हा कॅल्शियमने समृद्ध असलेला आणखी एक खाद्यपदार्थ आहे. बाळांना नाश्ता म्हणून दिल्या जाणाऱ्या नाचणीमध्ये प्रति 100 ग्रॅम सुमारे 344 मिग्रॅ कॅल्शियम असते. त्यामुळे, ज्यांना दूध प्यायला आवडत नाही, त्यांच्यासाठी नाचणीचा पर्याय उत्तम आहे
बदामासारख्या सुकामेव्यामध्येही कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. एक कप बदामामध्ये सुमारे 385 मिलिग्रॅम कॅल्शियम असते असे म्हटले जाते. कॅल्शियम मिळवण्यासाठी तुम्ही सुक्या अंजीरांचा पर्यायही निवडू शकता. त्यामध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे पचनक्रिया आणि हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. दुधाप्रमाणेच सोया उत्पादनांमध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. सोयाबीनपासून बनवलेल्या टोफूमध्ये, तसेच दुधाला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोया मिल्कमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पण आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. यामुळे तुम्हाला कोणत्या समस्या भासणार नाहीत.