Love Bite ठरतो जीवघेणा? प्रेमीयुगलांसाठी धोका काय.. उपाय जाणून घ्या

Love Bite Risk: लव्ह बाईट जीवघेणा ठरू शकतो का? नवीन संशोधनातून काय आले समोर? लव्ह बाईटचे डाग लपवले जाऊ शकतात. लव्ह बाईटमुळे नंतर वेदना होतात. या वेदना आणि डाग लपवण्यासाठी काय आहे उपाय?

Love Bite ठरतो जीवघेणा? प्रेमीयुगलांसाठी धोका काय.. उपाय जाणून घ्या
लव्ह बाईटचा धोका
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 10, 2026 | 3:40 PM

Love Bite Risk: लव्ह बाईट, प्रेमाचे चुंबन, चावा काय असतो हे सर्वांनाच माहिती आहे. प्रेम दाखवण्यासाठी असा प्रकार करण्यात येतो. मान, गळा, खांदे यावर लव्ह बाईट दिसतो. दीर्घकाळ येथे ओठांचा दाब पडल्यावर ही जागा लाल होते. त्याला लव्ह बाईट म्हणतात. पण लव्ह बाईटमुळे कुणाचा मृत्यू झाले असे तुम्ही ऐकले आहे का? तर जगभरात लव्ह बाईटने जीव जाण्याचा प्रकार घडला आहे. नुझीलंडमध्ये नुकताच असा प्रकार समोर आला. प्रेयसीने लव्ह बाईट घेतल्यानंतर ती जागा थोडा काळ सुन्न झाली आणि तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे लव्ह बाईटचा अतिरेक जीव घेऊ शकतो असे दिसते. शरीरासाठी कधी कधी हे अतिरेकी प्रेम धोकादायक ठरू शकते.

प्रत्येक लव्ह बाईट धोकादायक?

प्रत्येक लव्ह बाईट धोकादायक नसतो. साधारणपणे काही तास लव्ह बाईटची खूण कायम राहते. नंतर ते मिटतात. पण जर बऱ्याच वेळ लव्ह बाईटची खूण तशीच राहिली तर सावध व्हा. तर या लव्ह बाईटचा लाल रंग जांभळा झाला तर तेव्हा सतर्क व्हा. याशिवाय तो भाग ठणकत असेल, दुखत असेल तर मग तातडीने उपचार करा. डॉक्टरकडे धाव घ्या आणि त्यावर उपचार करा.

शरीरासाठी काय धोका?

इस्केमिक स्ट्रोक – मानेवर, गळ्यावर दीर्घकाळ चावल्याने, ओठ रगडल्याने या भागातील संवेदशनशील त्वचा आणि नसांना इजा होऊ शकते. वैद्यकीय तज्ज्ञ त्याला कॅरोटिड आर्टरी असे म्हणतात. जर जास्त वेळ असा दबाव पडला तर नस दबू शकते. त्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे इस्केमिक स्ट्रोकचा धोका बळावतो.

कॅरोटिड धमणी फाटण्याचा धोका- अनेकदा लव्ह बाईट दरम्यान कॅरोटिड धमणी फाटण्याचा धोका असतो. गळ्याच्या दोन्ही बाजूला या धमण्या असतात. या धमण्या मेंदू आणि शरीरात रक्त पुरवठा एक सारखा ठेवण्याचे काम करतात. जेव्हा या नसांवर जास्त दबाव पडतो तेव्हा या नसा फाटतात. दीर्घकाळ लव्ह बाईट घेतल्यास रक्त गोठू शकते. थांबू शकते. तो भाग सुन्न होऊन झटका बसू शकतो.

मेंदू पक्षघाताचा मोठा धोका

गळ्याभोवती, मानेभोवती धमण्यांचे मोठे जाळे असते. लव्ह बाईट वेळी नसांवर मोठा दबाव येतो. या नसा, धमण्या मेंदूला रक्त पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा करतात. अशावेळी जर एकदम रक्त पुरवठा वाढला अथवा कमी झाला तर मेंदूचा पक्षघाताचा (Brain Stroke) धोका वाढतो. अचानक चक्कर येऊ शकते. तो भाग सुन्न होऊ शकतो.

जर लव्ह बाईटचा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. अथवा घरी बर्फाने हलक्या हाताने तो भाग शेकून काढा. दोन तीन दिवस बर्फाने शेक दिल्यानंतर चौथ्या दिवशी कोमट पाण्याने त्या भागाला शेक द्या. तरीही लव्ह बाईटचा डाग गेला नाही. ती जागा काळीनिळी दिसत असेल अथवा तिथे दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवा.

Follow Us